नूंह हिंसाचाराचा निषेध करणार्या ३ हिंदूंवर सोहना (हरियाणा) येथे गोळीबार !
‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा !
(अल्लाहू अकबर म्हणजे अल्ला महान आहे !)
नूंह (हरियाणा) – ३१ जुलै या दिवशी नूंह येथे झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी गुरुग्रामजवळील सोहना शहरात काही हिंदू आंबेडकर चौकात जमले होते. या वेळी धर्मांधांनी त्यांच्यावर दगडफेक आणि गोळीबार केला. या प्रसंगी ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देण्यात आल्या. या वेळी ३ हिंदु युवक गंभीररित्या घायाळ झाले. या आक्रमणामागे हाकम, वसीम, अकरम, यासीन आणि त्यांचे मित्र यांचा हात आहे.
3 Hindus were shot during protest in Sohna against Nuh violence, a mob led by Hakam and Akram shouting ‘Allah-hu-Akbar’ attacked protestorshttps://t.co/HoNLbxbuxz
— OpIndia.com (@OpIndia_com) August 6, 2023
या आक्रमणामागे आम आदमी पक्ष आणि काँग्रेस या पक्षांच्या स्थानिक नेत्यांचा हात असल्याचेही समोर आले आहे. जावेद अहमद, मम्मन खान आणि आफ्ताब अशी या नेत्यांची नावे आहेत. (अशा धर्मांध नेत्यांवर आम आदमी पक्ष आणि काँग्रेस कारवाई करत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक)
संपादकीय भूमिकाशांततेचा संदेश देणार्या धर्माचे अनुयायी अशा प्रकारे हिंसाचार का करत आहेत ? असा प्रश्न एरव्ही तर्क लढवण्यात धन्यता मानणार्या पुरो(अधो)गाम्यांना का पडत नाही ? |