धर्मांधांनी सायबर पोलीस ठाणे जाळून पुरावे नष्ट करण्याचा केला होता प्रयत्न !
|
नूंह (हरियाणा) – येथे ३१ जुलै या दिवशी मुसलमानबहुल नूंह येथील हिंदूंच्या यात्रेवर आक्रमण करण्याचा धर्मांध मुसलमानांचा कट पूर्वनियोजित होता, याचा आणखी एक घटनाक्रम समोर आल्याचे सांगितले जात आहे. ३१ जुलै या दिवशी नल्हर शिवमंदिरापासून चालू झालेली ‘ब्रज मंडल शोभायात्रा’ जेव्हा शहरातील तिरंगा चौकात पोचली, तेव्हा धर्मांध मुसलमानांनी यात्रेवर मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि गोळीबार केला होता. यानंतर धर्मांधांनी मुख्य पोलीस ठाणे, शहर पोलीस ठाणे आणि महिला पोलीस ठाणे असलेल्या मार्गावरून जाऊन शिवमंदिर गाठले. या वेळी त्यांनी या पोलीस ठाण्यांवर आक्रमण केले नाही; मात्र २ किमी अंतर उलट्या दिशेने जाऊन तेथील सायबर पोलीस ठाणे गाठले आणि तेथे एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या सायबर गुन्ह्यांच्या कारवाईचे पुरावे असल्याने त्या पोलीस ठाण्याला आग लावली. यातून यात्रेवर आक्रमण केल्याचे निमित्त करून धर्मांध मुसलमानांना मुळात त्यांच्यावरील कारवाईचे सर्व पुरावे नष्ट करायचे होते, असे प्रत्यक्षदर्शी पोलिसांचे म्हणणे आहे.
Nuh violence: CCTV footage shows Islamist mob targeted Cyber Police Station in Nuh with a hijacked bus, allegedly to erase criminal recordhttps://t.co/NPpNS8ceMK
— OpIndia.com (@OpIndia_com) August 1, 2023
सायबर पोलीस ठाण्याच्या ‘सीसीटीव्ही’ कॅमेर्यात स्पष्ट दिसत आहे की, बसने पोलीस ठाण्याचे प्रवेशद्वार तोडण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर पोलीस ठाण्याची एक भिंत पाडण्यात आली. यानंतर धर्मांधांनी पोलीस ठाण्यातील उपस्थित पोलिसांवर गोळीबार केला. या पोलीस ठाण्याच्या बाहेर असलेल्या १० चारचाकी आणि १ दुचाकी वाहन यांना आग लावली. त्यानंतर धर्मांधांनी पोलीस ठाण्याला आगही लावली. पोलिसांचे पैसे, तसेच पोलीस ठाण्यातील वातानुकूलित यंत्र (कूलर), बॅटरी, इन्व्हर्टर आदी गोष्टी चोरून नेल्या. धर्मांधांना पोलिसांना जिवंत जाळायचे होते, असे उपस्थित पोलिसांनी सांगितले. जमावाने सायबर गुन्ह्यांचे पुरावे जाळण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्यास आरंभ केल्यावर जमाव पळून गेला. जमावापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी पोलिसांनीही ११५ गोळ्या झाडल्या.
एप्रिल २०२३ मध्ये सायबर गुन्ह्यांच्या विरोधात पोलिसांनी केली होती कारवाई !हरियाणा पोलिसांनी एप्रिल २०२३ मध्ये नूंह जिल्ह्यातील १४ गावांमधील ३२० ठिकाणी सायबर गुन्ह्यांशी संबंधित धाडी टाकल्या होत्या. या धाडी आतापर्यंतची सायबर गुन्ह्यांशी संबंधित भारतातील सर्वांत मोठी कारवाई होती. या वेळी ११ गुन्हें नोंदवण्यात आले होते. या कारवाईमध्ये ५ सहस्र सैनिक आणि अधिकारी सहभागी झाले होते. हा एकूण घोटाळा १०० कोटी रुपयांपर्यंत असल्याची माहिती तेव्हा करण्यात आली होती. त्या वेळी १२६ लोकांना कह्यात घेण्यात आले. त्यांपैकी ६६ जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे नूंह येथील याच सायबर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली होती. |
संपादकीय भूमिकाजेथे धर्मांध मुसलमान बहुसंख्य होतात, तेथे ते काय करू शकतात ?, याचे हे उदाहरण ! अशी परिस्थिती देशभरात होऊ न देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! |