‘चंद्रयान-३’चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश !

नवी देहली – भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रोने चंद्र मोहिमेचा भाग म्हणून १४ जुलै २०२३ या दिवशी प्रक्षेपित केलेल्या ‘चंद्रयान-३’ने पृथ्वीपासून ३ लाख किलोमीटरचे अंतर पार करून ५ ऑगस्टला सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश केला. चंद्रयानाचा हा महत्त्वपूर्ण टप्पा होता.

आता हे यान चंद्रावर उतरण्यापासून भारत आता केवळ एक पाऊल दूर आहे. या यानाने १ ऑगस्टला पृथ्वीभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करून चंद्राच्या दिशेने प्रवास चालू केला होता.