राजधानी देहलीसह जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के !
नवी देहली – देशाची राजधानी देहलीसह जम्मू-काश्मीर, तसेच अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या सीमांवर ५ ऑगस्टला रात्री ९.३१ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हा भूकंप ५.८ ‘रिक्टर स्केल’ तीव्रतेचा असल्याची माहिती राष्ट्र्रीय भूकंपशास्त्र केंद्राकडून देण्यात आली. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील हिंदुकुश प्रदेशात भूमीच्या खाली अनुमाने १८१ किलोमीटर खोल होता. हे ठिकाण जम्मू आणि काश्मीरमधील गुलमार्ग जिल्ह्याच्या वायव्येस ४१८ किलोमीटर अंतरावर आहे.
दिल्ली-NCR में भूकंप के तेज झटके, अफगानिस्तान का हिंदूकुश भूकंप का केंद्र#BreakingNews #earthquake #DelhiNCR | @Chandans_live @timechangelives @NeerajGaur_ pic.twitter.com/KA63UShPnd
— Zee News (@ZeeNews) August 5, 2023
राजधानी देहलीसह आजूबाजूच्या परिसरात भूकंपाच्या धक्के जाणवल्यानंतर देहली पोलिसांनी ट्वीट करून ‘आशा आहे की, तुम्ही सर्व जण सुरक्षित आहात. काही आपत्कालीन साहाय्य हवे असेल, तर ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा’, असे आवाहन केले.