सोलापूर येथे १५ सहस्र रुपयांची लाच मागणारा पोलीस नाईक अटकेत !
सोलापूर – वाळू चोरीची कारवाई न करण्यासाठी आणि तहसीलदारांना अहवाल न पाठवण्यासाठी २० सहस्र रुपयांची लाच मागून तडजोडीअंती १५ सहस्र रुपये घेणारा पोलीस नाईक दत्तात्रय रामचंद्र कांबळे याला पोलिसांनी ५ ऑगस्टला अटक केली आहे. तक्रारदाराचे मौजे कवठेगाव येथे घराचे बांधकाम चालू असून बांधकामासाठी लागणारी वाळू तक्रारदारांनी त्यांच्या भावाच्या घरासमोर रस्त्याच्या कडेला टाकली होती. ७ जुलै या दिवशी आरोपी लोकसेवक कांबळे यांनी तक्रारदार यांच्या भावास ‘ही वाळू चोरीची आहे, तुमच्याविरुद्ध गुन्हा नोंद करतो’, असे म्हणून तक्रारदार यांच्या भावास पोलीस ठाणे येथे घेऊन गेले. संबंधित प्रकरण मिटवण्यासाठी २० सहस्र रुपयांची लाचेची मागणी करत असल्याविषयी तक्रार प्राप्त झाली होती. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने ७ जुलै या दिवशी पंचासमक्ष तक्रारीची पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक कांबळे यांनी तक्रारदार आणि त्यांच्या भावाविरुद्ध वाळू चोरीची कारवाई न करण्यासाठी, तसेच तहसीलदारांना वाळू चोरीविषयी अहवाल न पाठवता, त्याविषयी ‘सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण केल्यावरून कारवाई करून प्रकरण मिटवून टाकतो’, असे सांगून १५ सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
संपादकीय भूमिका :
|