सद्गुरूंचे संतांनी वर्णिलेले महत्त्व
सद्गुरु एक समुद्र आहे !
गुरु सागरु रतनी भरपूरे । – गुरु नानकदेव
अर्थ : ‘गुरू समुद्र आहे आणि रत्नांनी भरपूर (परिपूर्ण) आहेत.’
गुरु साक्षात् ईश्वरच आहेत !
‘आपल्या देशात सर्वाधिक आदर आणि सन्मान गुरूंना मिळतो आणि आपली अशी श्रद्धा रहाते की, गुरु साक्षात् ईश्वरच आहेत. तितकी श्रद्धा आपल्याला आपल्या आई-वडिलांप्रतीही नसते. आई-वडील तर आपल्याला केवळ जन्म देतात; परंतु गुरु तर आपल्याला मुक्तिमार्ग दाखवतात.’
– स्वामी विवेकानंद
‘भवसागर तर जावेंगे….’
जय गुरुदेव जय गुरुदेव, जय गुरुदेव मनावेंगे ।
अपने गुरु की सेवा करके, भवसागर तर जावेंगे ।।
– संत मीराबाई