रविवारच्या वाचकांसाठी आठवड्यातील काही प्रमुख बातम्या
♦ (म्हणे) ‘गावात घुसणार्या अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्यांचे हात-पाय तोडा !’ – हरियाणात धर्मांधाचा चिथावणीखोर व्हिडिओ प्रसारित !
https://sanatanprabhat.org/marathi/705744.html
‘फरीदाबाद (हरियाणा) येथे सामाजिक माध्यमांतून प्रसारित झालेल्या एका व्हिडिओत एक व्यक्ती पोलिसांचे हात-पाय तोडण्याविषयी लोकांना चिथावणी देत असल्याचे दिसत आहे. चिथावणी देणार्या व्यक्तीचे नाव जाबिर घाटमिका असून तो हरियाणातील मुसलमानबहुल नूंह येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.’
♦ केवळ ५६ टक्के भारतीयच ईश्वराला मानतात ! – सर्वेक्षण
https://sanatanprabhat.org/marathi/705739.html
भारतियांमधील श्रद्धा अल्प असण्यामागील प्रमुख कारण हे बहुसंख्यांक असलेले हिंदूच होत, हे स्पष्ट आहे. त्यामुळे मानवाला चिरंतन आनंदाची प्राप्ती करून देणार्या हिंदु धर्माविषयी श्रद्धा नसणारे हिंदू हे कर्मदरिद्रीच होत !
‘विविध देशांतील किती टक्के लोक ईश्वराला मानतात, या संदर्भात नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले. ‘द वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स’च्या ट्विटर खात्यावरून या संदर्भातील आकडेवारी मांडण्यात आली आहे. या आकडेवारीत इंडोनेशिया सर्वांत वर असून तेथील ९३ टक्के लोकांची ईश्वरावर श्रद्धा आहे. त्यानंतर तुर्कीये ९१ टक्के, ब्राझिल ८४ टक्के, दक्षिण आफ्रिका ८३ टक्के, तर ५ व्या क्रमांकावर मेक्सिको या दक्षिण अमेरिकी देशाचा क्रमांक असून ७८ टक्के मेक्सिकन देवावर श्रद्धा ठेवतात. या सर्वेक्षणानुसार भारत ८ व्या क्रमांकावर असून केवळ ५६ टक्के भारतीय नागरिकच ईश्वराला मानतात.’
संपादकीय भूमिका : हिंदूंमधील धर्मशिक्षणाचा अभाव आणि स्वातंत्र्यापासून आतापर्यंत कोणत्याच शासनकर्त्याने हिंदूंना साधना न शिकवल्याचाच हा परिणाम होय, हे जाणा !
♦ ज्ञानवापी ऐतिहासिक चूक असल्याचे मुसलमानांनी स्वीकारावे ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
https://sanatanprabhat.org/marathi/706727.html
ज्ञानवापीच्या आत देवतांच्या मूर्ती आहेत. आम्ही या मूर्ती ठेवल्या नाहीत. जर ज्ञानवापीला ‘मशीद’ म्हटले, तर वाद होईल. ही ऐतिहासिक चूक झाली आहे. ज्याला देवाने दृष्टी दिली आहे, त्याला ‘मशिदीच्या आत त्रिशूळ का आहे ?’, ते पाहू द्या.