मुसलमानबहुल भागात सरकारी भूमीवर बांधलेल्या औषधांच्या २४ बेकायदेशीर दुकानांवर प्रशासनाचा बुलडोझर !
नूंह (हरियाणा) येथील हिंसाचारावरून प्रशासनाची कारवाई चालू !
नवी देहली – हरियाणाच्या नूंह येथे धर्मांध मुसलमानांनी केलेल्या हिंसाचाराच्या विरोधात जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचे हाती घेतले आहे. यांतर्गत ५ ऑगस्ट या दिवशी मुसलमानबहुल भागात असलेल्या सरकारी भूमीवर बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेली किमान २४ दुकाने बुलडोझरद्वारे पाडण्यात आली. यांमध्ये प्रामुख्याने औषधांच्या दुकानांचा समावेश आहे. आतापर्यंत अशा प्रकारच्या ५० ते ६० इमारतींवर इमारतींवर कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
Nuh Violence: Bulldozer action in Haryana, illegal encroachments demolishedhttps://t.co/oxsEdg5YU5#haryananuhclash #haryanamewatclashbetweentwogroup
— Oneindia News (@Oneindia) August 5, 2023
नूंहच्या नल्हार येथील ‘शाहीद हसन खान मेवाती सरकारी मेडिकल कॉलेज’च्या परिसरात ही दुकाने बांधण्यात आली होती. दुकाने पाडली जात असतांना पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ही दुकाने अनेक वर्षांपासून येथे असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे.
(म्हणे) ‘गरीब जनतेचा सरकारवरील विश्वासाला तडा गेला !’ – आमदार आफताब अहमद
काँग्रेसचे स्थानिक मुसलमान आमदार आफताब अहमद यांचा थयथयाट
मुसलमानबहूल नूंह येथील हिंदु जनतेच्या विश्वासाला गेली अनेक वर्षे तेथील धर्मांध मुसलमान समाज वारंवार तडा देत आला आहे. या वास्तविकतेवर अहमद महाशय गप्प का ?
स्थानिक प्रशासनाने केलेल्या या कारवाईच्या विरोधात स्थानिक काँग्रेस आमदार आफ्ताब अहमद यांनी निषेध केला आहे. ते म्हणाले की, नूंहमध्ये केवळ गरीब जनतेचीच घरे पाडण्यात येत असल्याने त्यांचा सरकारवर असलेल्या विश्वासाला तडा गेला आहे. गावकर्यांनी मला सांगितले की, या प्रकरणाची नोटीस आज दिली गेली आणि त्वरित घरे आणि दुकाने पाडण्यात आली.
आतापर्यंत २०२ लोकांना अटक ! – हरियाणाचे गृहमंत्री अनिल विजहरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी पत्रकारांना माहिती देतांना सांगितले की, नूंह येथील हिंसाचाराच्या प्रकरणी आतापर्यंत २०२ लोकांना अटक करण्यात आली असून ८० जणांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून कह्यात घेण्यात आले आहे. ज्या अर्थी डोंगर, तसेच घरांच्या छतांवरून दगड फेकण्यात आले, तसेच गोळीबार करण्यात आला, त्यावरून हा हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट होत आहे. आतापर्यंत एकूण १०२ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. |
संपादकीय भूमिकाअशा प्रकारे विविध राज्यांमध्ये धर्मांध मुसलमानांनी हिंसाचार केल्यावर त्यांच्या बेकायदेशीर इमारतींवर कारवाई करण्यापेक्षा एक अध्यादेश काढूनच सर्वच बेकायदेशीर इमारतींवर कारवाई करण्यासाठी देशातील विविध भाजप शासनांनी प्रयत्न केल्यास धर्मांधांच्या कुकृत्यांवर काही प्रमाणात तरी आळा बसेल ! |