नूंह येथे धर्मांध मुसलमानांनी रुग्णालयात घुसून हिंदु रुग्ण आणि डॉक्टर यांना केली होती अमानुष मारहाण !
|
नूंह (हरियाणा) – येथे ३१ जुलै या दिवशी विश्व हिंदु परिषदेकडून काढण्यात आलेल्या ब्रज मंडल यात्रेवर धर्मांध मुसलमानांच्या जमावाने केलेल्या आक्रमणासंदर्भातील एक नवा घटनाक्रम समोर आला आहे. धर्मांध मुसलमानांनी नल्हार महादेव मंदिरात आश्रय घेतलेल्या हिंदूंवर केवळ गोळीबारच केला नाही, तर अलवर रुग्णालयात घुसून मुसलमानांना वेगळे करून हिंदु रुग्णांना आणि डॉक्टरांना अमानुष मारहाण केली होती. पोलिसांना ‘सीसीटीव्ही फूटेज’च्या आधारे ही माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नासिर आणि अंजुम नावाच्या दोन आरोपींना अटक केली आहे.
नूहं के अस्पताल में भी घुसी थी भीड़, मुस्लिमों को अलग कर हिंदू मरीज-डॉक्टरों को पीटा: गर्भवती महिला और 3 साल की बच्ची को भी नहीं छोड़ा#NuhViolence #AttackOnHospital https://t.co/zh3rh1StXA
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 4, 2023
१. धर्मांध मुसलमानांच्या जमावाने अलवर रुग्णालयात प्रचंड उन्माद माजवला. त्यांच्या हातात लाठ्या-काठ्या आणि इतर शस्त्रे होती. या जमावाने एका हिंदु तरुणाला अमानुष मारहाण केली. त्याच्या वाहनाची जाळपोळ केली, तसेच एका डॉक्टरच्या चारचाकी गाडीलाही आग लावली.
२. आतंकवाद्यांनी डॉक्टरांच्या तीन वर्षांच्या मुलीलाही काठीने मारहाण केली. रुग्णालयात दाखल असलेल्या गर्भवती महिलेवर आक्रमण केले. महिलेने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तिला ढकलून खाली पाडण्यात आले.
संपादकीय भूमिकाअशा स्वरूपाच्या घटना भारतात सर्वत्र घडत असतांनासुद्धा ‘देशातील मुसलमानच घाबरलेला आहे’, हेच सत्य आहे, हे लक्षात घ्या ! |