सराफी व्‍यवसायासहित तळमळीने सनातनची सात्त्विक उत्‍पादने आणि ग्रंथ वितरण करणारे फरीदाबाद येथील हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. सचिन कपिल !

‘श्री. सचिन कपिल यांचे फरीदाबादमध्‍ये ‘अपना ज्‍वेलर्स’ हे दुकान असून ते मागील काही वर्षांपासून हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आहेत. ते अनेक वर्षांपासून गुरुपौर्णिमा स्‍मरणिकेसाठीही विज्ञापन देत असून अर्पणही करतात. श्री. सचिन यांनी सेवेच्‍या माध्‍यमातून केलेले साधनेचे प्रयत्न आणि त्‍यांना आलेली अनुभूती पुढे दिली आहे.

१. श्री. सचिन कपिल यांनी केलेले समष्‍टी सेवेचे प्रयत्न !

अ. श्री. सचिन कपिल हे समाजात ‘सनातन पंचांग’ आणि ‘सात्त्विक उत्‍पादने’ यांचे महत्त्व सांगून त्‍यांचे वितरण करतात. ते त्‍यांच्‍या दुकानात आलेल्‍या ग्राहकांना भेट स्‍वरूपात सनातनची सात्त्विक उत्‍पादने, ग्रंथ आणि पंचांग देतात.

आ. सचिन यांच्‍या वडिलांचे देहावसान झालेे. तेव्‍हा त्‍यांनी सनातन संस्‍थेच्‍या वतीने एक प्रवचन आयोजित केले होते. त्‍या वेळी कुलदेवता आणि दत्त यांच्‍या नामजपाचे महत्त्व सांगून त्‍यांनी सनातन निर्मित नामपट्ट्यांचेही समाजात वितरण केले.

इ. सचिन यांनी फरीदाबादच्‍या ‘वर्ल्‍ड स्‍ट्रीट’ येथे एक नवीन दुकान चालू केले आहे. त्‍याचे उद़्‍घाटन त्‍यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्‍या शुभहस्‍ते केले.

ई. त्‍यांच्‍या दुकानाच्‍या तळमजल्‍याच्‍या जागेत त्‍यांनी सनातन संस्‍थेची सात्त्विक उत्‍पादने आणि ग्रंथ वितरण करण्‍याच्‍या उद्देशाने ठेवले आहेत. तेथे ते व्‍यवसाय करत समाजातील लोकांना साधना सांगून धर्मप्रचाराची सेवाही करतात.

२. अनुभूती

२ अ. सनातनचा भीमसेनी कापूर वापरण्‍यास आरंभ केल्‍यावर सर्दीचा त्रासू दूर होणे : सचिन यांना धूळ आणि हवामानात पालट यांमुळे वर्षभर सर्दीचा त्रास होत असे. पुष्‍कळ औषधोपचार करूनही त्‍यांची सर्दी बरी होत नव्‍हती. त्‍यांनी सनातन संस्‍थेचा भीमसेनी कापूर वापरण्‍यास आरंभ केल्‍यावर त्‍यांची सर्दी पूर्ण बरी झाली. आता त्‍यांना धुळीमुळे किंवा हवामानातील पालट होण्‍याच्‍या काळात सर्दी होत नाही.’

– सौ. सीमा शर्मा, फरिदाबाद (२५.२.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक