ठाणे येथील सौ. भक्ती गैलाड यांचे चुकांविषयी झालेले चिंतन !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नेहमी सांगतात, ‘‘साधकांनी स्वतःतील अहं न्यून करण्यासाठी स्वतःच्या चुका सांगणे आवश्यक आहे. साधकांनी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांची प्रक्रिया राबवणे महत्त्वाचे आहे.’’ ‘चुकांचा अभ्यास केल्याने सेवेत साहाय्य होते’, हे सद़्गुरु आणि संत यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या लक्षात येऊ लागले. गुरुकृपेमुळे मला चुका सांगण्याविषयी सुचलेले विचार येथे दिले आहेत.
१. चुका सांगणे, म्हणजे दायित्व स्वीकारणे.
२. चुका शोधणे, म्हणजे सेवेचे सखोल चिंतन करणे.
३. चुका सांगितल्यामुळे सेवा परिपूर्ण होण्यासाठी समष्टी साहाय्य मिळतेे.
४. चुकांच्या चिंतनामुळे सेवेची व्याप्ती बारकाव्यांनिशी (सखोल) काढायला साहाय्य होते.
५. चुका सांगणे, म्हणजे स्वतःमधील संकुचितपणा आणि अल्पसंतुष्टता दूर करून परिपूर्ण सेवेकडे जाण्याची वरची पायरी.
‘गुरुमाऊलींनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) हे विचार सुचवले आणि लिहून घेतले’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. भक्ती गैलाड, ठाणे (१८.३.२०२३)