सामूहिक बलात्कारानंतर जन्मलेल्या मुलाने २८ वर्षांनंतर आईला मिळवून दिला न्याय !
शाहजहाँपूर (उत्तरप्रदेश) – येथील २८ वर्षापूर्वीच्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सामूहिक बलात्काराच्या वेळी पीडित तरुणी १२ वर्षांची होती. २८ वर्षानंतर उत्तरप्रदेश पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि आरोपीला अटक करून कारागृहात टाकले. १९९४ मध्ये नकी हसन आणि गुड्डू हसन नावाच्या दोघा सख्ख्या भावांनी १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला होता. सामूहिक बलात्कारानंतर पीडितेने एका मुलाला जन्म दिला होता. मुलाने आईला वडिलांचे नाव विचारले असता घटनेची सत्यता त्याला समजली. आईला न्याय मिळवून देण्यासाठी त्याने कायद्याचा आधार घेतला. मुलाने तब्बल २८ वर्षांनंतर आईला न्याय मिळवून दिला.
A case that will increase respect for @Uppolice
Accused was hiding in Hyderabad since his DNA sample was taken..
UP: Born out of rape, son finds mother after 27 years, helps nab accused
https://t.co/qm2lRK4eeG pic.twitter.com/wuD8zbSLNr— Kanwardeep singh (@KanwardeepsTOI) August 4, 2022
या प्रकरणी ४ मार्च २०२१ या दिवशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी गुड्डू हसन याला अटक केली आहे, तर नकी हसन पसार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीने गुन्ह्याची स्वीकृती दिली आहे, असे पोलीस निरीक्षक धर्मेंद्र गुप्ता यांनी सांगितले.