कर्जत ते भिवपुरी स्थानकांच्या दरम्यान रेल्वे रुळांखाली मोठा खड्डा !
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत !
ठाणे, ४ ऑगस्ट (वार्ता.) – कर्जत ते भिवपुरी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रुळांखाली मोठा खड्डा पडल्यामुळे मध्य रेल्वेची या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मागील काही दिवसांत परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने रुळांवर पाणी साचले होते. पाणी ओसरल्यानंतर तेथे खड्डा पडला.
Mumbai Local Train News: कर्जत ते भिवपूरी स्थानकादरम्यान मोठा खड्डा; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीतhttps://t.co/uJJbaHyy0x#Saamtv #Saamdigital #Localtrain
— SaamTV News (@saamTVnews) August 4, 2023