मेवात (हरियाणा) येथील हिंदूंच्या हत्येच्या निषेधार्थ सातारा येथे जिल्हाधिकार्यांना निवेदन !
सातारा, ४ ऑगस्ट (वार्ता.) – हरियाणा राज्यातील मेवात येथे हिंदु महाभारत यात्रेसाठी गेलेल्या अनेक हिंदूंची दिवसा हत्या करण्यात आली. वाहनांना आग लावण्यात आली. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सातारा येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने सातारा जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी विश्व हिंदु परिषदेचे विजय गाढवे, बजरंग दलाचे रवींद्र ताथवडेकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सतिश ओतारी, सरदार विजयसिंह बर्गे, हृषिकेश कापसे, हिंदु जनजागृती समितीचे हेमंत सोनवणे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, हरियाणामध्ये दिवसाढवळ्या हिंदूंच्या हत्या झाल्या. देहली येथे मोहरमच्या मिरवणुकीत मुसलमानांकडून हिंसाचार घडवण्यात आला आहे. या हिंसाचारात ६ पोलिसांसह १२ जण गंभीर घायाळ झाले आहेत. या वेळी मुसलमानांनी तलवारी नाचवून दहशत माजवली, तसेच वाहनांची मोडतोड केली. बिहार येथे मोहरमच्या मिरवणुकीत ३ ठिकाणी हिंसाचार घडवून आणण्यात आला आहे. एका ठिकाणी बाँबस्फोट घडवून आणण्यात आला आहे. यामध्ये राधाकुमारी नावाची मुलगी गंभीर घायाळ झाली आहे. या घटना घडवणारे आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी करणार्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.