महाराष्ट्राचे नायक छत्रपती शिवाजी महाराजच ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
औरंगजेबाची पिलावळ ठेचून काढण्याची चेतावणी
मुंबई, ४ ऑगस्ट (वार्ता.) – औरंगजेबाचे ‘स्टेटस’ महाराष्ट्रात चालणार नाही. औरंगजेब कधीही या देशाचा नायक होऊ शकत नाही. औरंगजेब महानायक नाही, तर खलनायक आहे. त्याने मंदिरे उद़्ध्वस्त केली. सत्तेसाठी बापाला कारागृहात टाकले. भावाला ठार मारले. छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या केली. या काळातही काही लोक असे करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारची पिलावळ सहन करणार नाही. महाराष्ट्राचे नायक छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत. औरंगजेबाची पिलावळ ठेचून काढण्यात येईल, अशी चेतावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ४ ऑगस्ट या दिवशी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत अंतिम आठवडा चर्चेला उत्तर देतांना ते बोलत होते.
औरंगजेब कभी राजा नही हो सकता राजा तो एक ही था छत्रपति शिवाजी महाराज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी 🙏 pic.twitter.com/OMdM6XdQFZ— प्रसाद प्रभुणे (@PrasadPrabhun10) August 4, 2023
या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले,…
१. कुटुंबातील कुणी आजारी असल्यास उपचार कुठून करायचे ? ही सर्वसामान्यांची चिंता असते. त्यामुळे सर्व सरकारी रुग्णालयांत सर्व उपचार विनामूल्य करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.
२. आमच्या आमदारांना ‘खोके’, ‘गद्दार’ असे हिणवलेे गेले; परंतु महाराष्ट्राचा ‘महागद्दार’ कोण हे पाहिले पाहिजे. ज्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या विचारांशी गद्दारी केली, ते कोण आहेत ?
३. आम्हाला प्रेम हवे असते. मुख्यमंत्री पद महत्त्वाचे नाही. महाविकास आघाडीच्या काळात अहंकारामुळे राज्याच्या जनतेची हानी झाली. त्या वेळी अहंकारामुळेच उद्योग थांबवण्यात आले. आमची सत्ता आल्यावर उद्योगांना चालना दिली. सर्व प्रकल्प युद्धपातळीवर चालू आहेत. हे सरकार २४ घंटे काम करणारे आहे.
४. देशाच्या अर्थव्यवस्थेला उंचावण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मोदीजी यांच्याकडे जागतिक नेता म्हणून पाहिले जाते. त्यांचा त्याग आहे. ९ वर्षांत एकही सुटी न घेतलेला हा नेता आहे. त्यांचे नेतृत्व देशाला प्रगतीपथावर नेईल.
कोविड महामारीच्या काळात भ्रष्टाचार करणार्यांना सोडणार नाही !
“कोरोना के दौरान 300 रुपये का बैग 3,000 रुपये में खरीद रहे हैं”, CM एकनाथ शिंदे ने ठाकरे समूह पर साधा निशानाhttps://t.co/timivmWLg4#Maharashtra #MaharashtraPolitics #EknathShinde #udhhavthackrey #KhabarFast #khabarfastnews pic.twitter.com/lk1vZ2maDk
— KHABAR FAST (@Khabarfast) August 4, 2023
कोविड काळात भ्रष्टाचार करणार्यांना सोडणार नाही. ऑक्सिजन प्लांट कालबाह्य झालेले वापरण्यात आले, हा अहवाल आहे. ‘डेड बॅग’मध्ये (मृतदेहांसाठी वापरण्यात येणारी बॅग) घोटाळा करण्यात आला. २००-३०० रुपयांत मिळणारी बॅग ६ सहस्र रुपयांना विकण्यात आली. लाईफ लाईन रुग्णालयात स्वत:च्या माणसांना डॉक्टर दाखवून पैसे लुटण्यात आले. मढ्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचे हे पाप आहे. वस्तूस्थिती बाहेर आल्यावर दोषींना सोडणार नाही, अशी तंबी एकनाथ शिंदे यांनी या वेळी दिली.
मुख्यमंत्री साहाय्यता निधीचा १ वर्षात १०० कोटीचा आकडा पार !
‘महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून केवळ अडीच कोटी रुपये व्यय करण्यात आले; मात्र आमच्या एका वर्षाच्या काळात आजच १०० कोटी रुपयांचा आकडा पार झाला’, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.