‘जय श्रीराम’ लिहिल्याने ख्रिस्ती शाळेतील शिक्षकाची हिंदु विद्यार्थ्यास मारहाण
हिंदु संघटनांनी जाब विचारल्यावर प्रशासनाकडून क्षमायाचना आणि शिक्षकाचे निलंबन !
कोल्हापूर – शहरातील एका ख्रिस्ती शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या उत्तरपत्रिकांवर प्रारंभी ‘जय श्रीराम’ असे लिहिले होते. ही गोष्ट शाळेतील एका शिक्षकाला समजल्यावर त्याने एका हिंदु विद्यार्थ्याला मारहाण केली. हा प्रसंग हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांना समजल्यावर त्यांनी एकत्रित येऊन शाळेच्या प्राचार्यांना याचा जाब विचारला. प्रारंभी आडमुठी भूमिका घेणार्या प्राचार्यांनी नंतर नमते घेत झालेल्या प्रकाराची क्षमायाचना केली आणि हिंदु विद्यार्थ्यास मारहाण करणार्या शिक्षकास निलंबित केले. शाळेत हिंदु विद्यार्थिनींना बांगड्या घालणे, कुंकू लावणे याला प्रतिबंध करण्यात येत असून हे चुकीचे असल्याचेही हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी प्राचार्यांना लक्षात आणून दिले आणि त्याविषयी धारेवर धरले. ( हिंदूबहुल असलेल्या देशात विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’ लिहायचे नाही, तर अन्य कुणाचे नाव लिहायचे ? काही दिवसांपूर्वीच एका महाविद्यालयात भगवी पट्टी घालणार्या विद्यार्थ्यास वर्गाबाहेर काढण्याचा प्रकार झाला होता. दिवसेंदिवस या वाढत्या घटना पहाता शालेय प्रशासन नेमके काय करते ? – संपादक)
संपादकीय भूमिका :ख्रिस्ती शाळा वारंवार हिंदु विद्यार्थ्यांची गळपेची करतात, यावर सरकार कोणती कठोर कारवाई करणार ? |