गौरीकुंड (उत्तराखंड) येथे केदारनाथ मार्गावर दरड कोसळली !
दरडीखाली अनेकजण गाडले गेल्याची शक्यता !
गौरीकुंड (उत्तराखंड) – केदारनाथ मार्गावरील गौरीकुंड येथे दरड कोसळल्याने ढिगार्याखाली अनेक जण गाडले गेले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम चालू आहे.
BREAKING | उत्तराखंड के गौरीकुंड में बारिश से तबाही, पहाड़ी से गिरा मलबा, 13 लोग लापताhttps://t.co/smwhXUROiK@Aayushinegi6 @anchorjaya @awdheshkmishra#Uttarakhand #Gaurikund #HeavyRain #Flood pic.twitter.com/H1zpXLl8JT
— ABP News (@ABPNews) August 4, 2023
उत्तराखंड येथील रुद्रप्रयाग या ठिकाणी पूर आल्याने आणि दरड कोसळल्याने १३ लोक बेपत्ता झाले आहेत. या ठिकाणी असलेली ३ दुकानेही वाहून मंदाकिनी नदीत वाहून गेली, असेही सांगण्यात येत आहे. बेपत्ता झालेल्यांपैकी १२ लोकांची ओळख पटली आहे. या १२ जणांमध्ये ३ वर्षे ते १४ वर्षे या वयोगटातील ५ मुलांचाही समावेश आहे.