चीनला गोपनीय माहिती पुरवणार्या अमेरिकी नौदलातील २ अधिकार्यांना अटक
वॉशिंग्टन (अमेरिका) – चीनला गोपनीय माहिती पुरवल्यावरून अमेरिकेच्या नौदलातील २ अधिकार्यांना अटक करण्यात आली आहे. वेनहेंग झाओ आणि जिनचाओ वेई अशी त्यांची नावे आहेत. झाओ याने अमेरिकी सैन्याशी संबंधित अनेक संवेदनशील छायाचित्रे आणि व्हिडिओ सुमारे १ लाख २५ सहस्र रुपयांना विकले. जिनचाओ वेई याने राष्ट्रीय संरक्षणाशी संबंधित माहिती पुरवली होती.
अमेरिकी नौसेना के दो जवान गिरफ्तार, चीन के साथ खुफिया जानकारी कर रहे थे शेयर#china #personnelhttps://t.co/m6ZPEXLzKk
— India TV (@indiatvnews) August 4, 2023
अमेरिकी अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, सॅन डिएगो येथील नौदल तळावर सेवा करणार्या वेई याने चीनला अमेरिकी युद्धनौकांशी संबंधित ३० हस्तपुस्तिका आणि नौकांच्या शस्त्रास्त्रांशी संबंधित माहिती दिली. या युद्धनौकांमधील त्रुटी काय आहेत ? हेही त्याने चीनला सांगितले आहे.
संपादकीय भूमिकाचीन अमेरिकेची गोपनीय माहिती गोळा करू शकतो, तर भारतातील माहिती गोळा करणे त्याला अवघड नसेल, अशीच शंका येते ! |