फ्रान्समध्ये झालेल्या दंगलींमध्ये १२ सहस्र गाड्या आणि अडीच सहस्र इमारतींमध्ये लावण्यात आली होती आग !
|
पॅरिस (फ्रान्स) – जून २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात अरब वंशाच्या नाहेल या १७ वर्षीय युवकाची फ्रेंच पोलिसांनी कथित हत्या केल्यावरून संपूर्ण फ्रान्समध्ये हिंसाचार उसळला होता. त्या काळात धर्मांध मुसलमानांनी फ्रान्सच्या अनेक शहरांमधील जनतेला वेठीस धरून जाळपोळ केली होती. या प्रकरणी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी हिंसाचारामुळे झालेल्या हानीची आकडेवारी सांगितली आहे. दंगलखोरांनी १२ सहस्र ३१ चारचाकी वाहने, तसेच २ सहस्र ५०८ इमारतींना आग लावली होती अथवा तोडफोड केली होती. यांत २५८ पोलीस ठाणी आणि २४३ शाळा यांचा समावेश आहे. या हिंसाचारात ८०० पोलीस अधिकारी घायाळ झाले होते, अशी माहिती मॅक्रॉन यांनी फ्रेंच साप्ताहिक ‘ले फिगारो’ला दिली.
French President Macron sparks controversy with comments blaming children of single parents for recent riotshttps://t.co/rTMm2xUyH8
— WION (@WIONews) August 4, 2023
मॅक्रॉन पुढे म्हणाले की,
१. ३ सहस्र ५०५ लोकांना या हिंसाचाराप्रकरणी अटक करण्यात आली होती. १ सहस्र ५६ लोक अजूनही कारागृहात आहेत. यांमधील एक तृतीयांश दंगलखोर हे अल्पवयीन आहेत.
सर्वांत लहान दंगलखोर हा केवळ ११ वर्षांचा मुलगा आहे.
२. अल्पवयीन मुलांपैकीही ७५ टक्के असे आहेत, जे एकतर सामाजिक देखभालीमध्ये रहातात अथवा त्यांचे आई अथवा वडील एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. अशांना हाताळणे ही फ्रान्ससमोरील मोठी समस्या आहे; कारण हे उद्याचे नागरिक आहेत.
३. या आकड्यांवरून हे लक्षात येते की, या युवकांचा त्यांचे पालक, शालेय शिक्षक आणि लोकशाही संस्था यांच्याविषयीचा विश्वास अल्प होत चालला आहे.
४. अशा युवकांकडे त्यांचे पालक आणि शिक्षक यांनी अधिक लक्ष देऊन शिक्षित केले पाहिजे. आपण अशा कुटुंबांना साहाय्य करायला हवे. यामुळे ते पुढे जाऊन उत्तरदायी नागरिक बनू शकतील.
५. दंगलखोर अल्पवयीन मुलांच्या पालकांना दंडित करण्याचीही आवश्यकता आहे.
संपादकीय भूमिकाफ्रान्समध्ये झालेल्या दंगलींमागे सीरिया, अफगाणिस्तान, तसेच उत्तर आफ्रिकेतून युरोपमध्ये शरण घेतलेल्या धर्मांध मुसलमानांचा हात होता. शांतीचा संदेश देणार्या धर्मातील अशा हिंसाचारी अनुयायांना आता मृत्यूदंड देण्याची कुणी मागणी केल्यास चूक ते काय ? |