मेवात येथे झालेल्‍या आक्रमणाचा विहिंप-बजरंग दल यांच्‍याकडून राहाता (अहिल्यानगर) येथे निषेध !

प्रतिकात्मक छायाचित्र

राहाता (जिल्हा अहील्यानगर) – श्रावण सोमवारच्‍या निमित्ताने प्रतिवर्षी निघणार्‍या ब्रजमंडल यात्रेवर ३१ जुलैला जिहादी मुसलमानांनी आक्रमण केले. या प्रसंगी गाड्या पेटवण्‍यात आल्‍या, दगडफेक करण्‍यात आली, गोळीबार करण्‍यात आला. या घटनेच्‍या निषेधार्थ विहिंप-बजरंग दल यांच्‍याकडून राहाता येथे निदर्शने करण्‍यात आली. या भ्याड आक्रमणाचा तीव्र निषेध विहिंप बजरंग दल, उत्तर नगर जिल्हा संयोजक शुभम मुर्तडक यांनी केला आहे. मेवात येथील आक्रमणाचे सखोल अन्‍वेषण होऊन दोषींना तात्‍काळ शिक्षा करण्‍यात यावी, देशविघातक शक्तींना समूळ नष्ट करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली, तसेच स्थानिक पोलीस कार्यालयाच्या वतीने या संदर्भातील निवेदन राष्ट्रपतींना पाठवण्यात आले.

या वेळी विहिंपचे योगेश मखाणा, बजरंग दलाचे जिल्हा बलोपासना प्रमुख तेजस मुर्तडक, तालुका संयोजक अनिकेत सोमवंशी आदींसह मोठ्या प्रमाणात विहिंप-बजरंग दल कार्यकर्ते उपस्थित होते.