खलिस्तानी आतंकवाद्याला देहली विमानतळावरून अटक
|
अमृतसर (पंजाब) – पंजाब पोलिसांनी ‘खलिस्तान लिबरेशन फोर्स’ या आतंकवादी संघटनेचा आतंकवादी हरजीत सिंह याला देहली विमानतळावरून अटक केली. तो स्पेनचा नागरिक आहे. तसेच पोलिसांनी हरजीत सिंह याचा लुधियाना येथील साथीदार अमरिंदर सिंह उपाख्य बंटी यालाही अटक केली आहे.
#Punjab Police nab man from #Delhi airport on charge of terror financing https://t.co/dKtLGRmerT
— The Times Of India (@timesofindia) August 3, 2023
पोलीस अधिकारी श्री. अश्वनी कपूर यांनी सांगितले की, हरजित सिंह हा मूळचा गुरुदासपूरमधील घनशामपूर गावचा रहिवासी असून तो एक मासापूर्वी भारतात आला होता. पंजाब पोलिसांना त्याचा आतंकवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याची माहिती मिळाली होती. हरजित आणि अमरिंदर हे सामाजिक माध्यमांतून एकमेकांच्या संपर्कात होते. हरजितने धार्मिक नेत्यांच्या हत्येसाठी अनेक वेळा अमरिंदर याला स्पेनमधून पैसे पाठवले होते.