भिवंडी येथे ४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्याला अटक !
ठाणे, ४ ऑगस्ट (वार्ता.) – भिवंडीजवळील कोनगाव पोलीस ठाण्याच्या सीमेत एका घरात खेळणार्या ४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या सागर छात्री (वय २६ वर्षे) याला पोलिसांनी अटक केलीे. त्याच्या विरोधात विविध कलमांन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
26-year-old arrested for sexually assaulting four-year-old in Bhiwandi
(Anamika Gharat reports )https://t.co/ompMaMBOZH pic.twitter.com/furhq02tgr
— HTMumbai (@HTMumbai) August 4, 2023
आरोपीची पीडित बालिकेच्या कुटुंबाशी ओळख होती. याचा अपलाभ घेऊन तो पीडितेच्या घरी जात असे. ३१ जुलै या दिवशी मुलीचे वडील कामावर गेले होते आणि आई स्वयंपाकघरात काम करत होती, तर भाऊ झोपला होता. या संधीचा अपलाभ घेऊन त्याने वरील प्रकार केला. मुलगी रडायला लागल्याने आईने तिला विचारल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार प्रविष्ट केली असून या प्रकरणी पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.
संपादकीय भूमिकाकठोर शिक्षेअभावी गुन्हेगारांना शिक्षेचे भय वाटत नाही आणि गुन्हे वाढत रहातात, हे लक्षात घेऊन सरकारने गुन्हेगारांना धडकी भरेल, अशी कारवाई केली पाहिजे ! |