नांदगाव (सिंधुदुर्ग) रेल्वेस्थानकावर ‘तुतारी एक्सप्रेस’ थांबणार
सिंधुदुर्ग – केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची २ ऑगस्ट या दिवशी नवी देहली येथे भेट घेतली. या वेळी मंत्री राणे यांनी कोकण रेल्वेशी संबंधित विविध मागण्यांविषयी सविस्तर चर्चा केली.
आज केंद्रीय रेल्वे मंत्री @AshwiniVaishnaw जी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी कोकण रेल्वेसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. pic.twitter.com/GQfTYJ3gRI
— Narayan Rane (@MeNarayanRane) August 2, 2023
या वेळी ‘कोकण रेल्वे मार्गावरील कणकवली तालुक्यातील नांदगाव रेल्वेस्थानकावर ‘तुतारी एक्सप्रेस’ या गाडीला थांबा मिळावा’, अशी मागणी मंत्री राणे यांनी केली. या मागणीनुसार रेल्वेमंत्री वैष्णव यांनी ही गाडी नांदगाव येथे थांबवण्याची अनुमती दिली.