म्हादई ‘प्रवाह’च्या ३ सदस्यांनी गोव्याच्या मुख्य सचिवांची घेतली भेट

म्हादई जलवाटप तंटा

पणजी, ३ ऑगस्ट (वार्ता.) – म्हादई ‘प्रवाह’ प्राधिकरणाच्या ३ सदस्यांनी गोवा सचिवालयात राज्याचे मुख्य सचिव पुनित कुमार गोयल यांची भेट घेतली. या भेटीतील चर्चेविषयी अद्याप माहिती मिळालेली नाही. केंद्रीय जल शक्ती मंत्रालयाने म्हादई ‘प्रवाह’ प्राधिकरणावर पी.एम्. स्कॉट यांच्या अध्यक्षतेखाली एकूण ३ सदस्यांची नुकतीच नेमणूक केली आहे. म्हादई ‘प्रवाह’ प्राधिकरणाचे मुख्यालय गोव्यात पणजी येथे होणार आहे. म्हादई नदीचे पाणी अनधिकृतपणे वळवले जाऊ नये आणि पाण्याचे योग्यरित्या वितरण व्हावे, यासाठी केंद्रशासनाने म्हादई ‘प्रवाह’ प्राधिकरणाची स्थापना केली आहे.

‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा