परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्म ज्ञान मिळवण्याच्या सेवेविषयी श्री. राम होनप यांना दिलेला आशीर्वाद !
‘वर्ष २००४ नंतर वर्ष २०१६ पासून मला सूक्ष्मातून ज्ञान मिळण्यास परत प्रारंभ झाला. विविध विषयांवर मिळत असलेल्या सूक्ष्म ज्ञानाचे टंकलेखन मी संगणकीय धारिकांमध्ये करत होतो. या धारिका परात्पर गुरु डॉक्टर पडताळायचे. हे सूक्ष्म ज्ञान आवडत असल्याने ते प्रत्येक धारिकेवर ‘आवडले’, असा शेरा द्यायचे.
वर्ष २०१७ मध्ये एक दिवस परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘‘तुझी प्रत्येक धारिका छानच असते. त्यामुळे मी यापुढे ‘आवडले’, असा शेरा देणार नाही. ‘तुझी प्रत्येक धारिकाच मला आवडते’, असे यापुढे समज.’’ याचा अर्थ ‘माझ्याकडून सूक्ष्म ज्ञान मिळवण्याची सेवा नेहमी ईश्वराला अपेक्षित अशी होणार आहे’, असा गुरूंनी आशीर्वादच मला दिला आहे’, असे मला जाणवले आणि त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.२.२०२३)