श्री जयन्त-करावलम्बं स्तोत्रम् ।
श्री जयन्त-करावलम्बं स्तोत्रम् ।
श्री रामनाथीपूर- निकेतन-दिव्यमूर्ते गोविंद माधव हरे युगपुरुष ।
कृपाकटाक्ष- परिरक्षित-सर्वलोक श्री श्री जयन्त मम देहि करावलम्बम् ॥ १ ॥
अर्थ : रामनाथी आश्रमात निवास करणार्या हे दिव्य मूर्ते, आपणच गोविंद, माधव, हरि यांच्याप्रमाणे युगपुरुष आहात. आपल्या कृपाकटाक्षांनी आपण सर्व जगताचे रक्षण करता. हे श्री श्री जयंत, मला आपल्या हातांनी आधार द्या. (माझे रक्षण करा.)
सप्तर्षिदि-ऋषि-वन्द़ित-पादपद्मम् श्रीमत् सर्वज्ञान-उगमस्थानम् ।
प्रीतिस्वरूप भवबन्ध-निवारिन् श्री श्री जयन्त मम देहि करावलम्बम् ॥ २ ॥
अर्थ : सप्तर्षी आदी ऋषींनी ज्यांच्या चरणकमलांना वंदन केले आहे, अशा वैभवसंपन्न, सर्व ज्ञानाचे उगमस्थान असणार्या, प्रीतीस्वरूप, संसारपाशातून मुक्त करणार्या हे श्री श्री जयंत, मला आपल्या हातांनी आधार द्या. (माझे रक्षण करा.)
करुणापयोनिधि भवसागर-तारणाय ग्रन्थनिर्मितिः भवदीय जनकल्याणाय ।
जनकल्याणार्थं भवान् सदा कार्यरतः श्री श्री जयन्त मम देहि करावलम्बम् ॥ ३ ॥
अर्थ : करुणेचा सागर असलेल्या आपण जनकल्याणासाठी आणि संसारसागर तरून जाण्यासाठी ग्रंथनिर्मिती केली. जनकल्याणासाठी आपण सतत कार्यरत आहात. हे श्री श्री जयंत, मला आपल्या हातांनी आधार द्या. (माझे रक्षण करा.)
सत्यस्वरूप सत्यमार्गदर्शक सदाशरण्यः जगन्नाथ कमलनाभ सुरेशविष्णुः ।
हिन्दु राष्ट्र-स्थापनार्थं त्वं संकल्पं कृतवान् श्री श्री जयन्त मम देहि करावलम्बम् ॥ ४ ॥
अर्थ : सत्यस्वरूप, सत्याचे मार्गदर्शक, नेहमी शरण जाण्यास योग्य, हे जगन्नाथ, कमलनाभ, सुरेशविष्णु, आपण हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संकल्प केला आहे. हे श्री श्री जयंत, मला आपल्या हातांनी आधार द्या. (माझे रक्षण करा.)
संसारबन्धन-निवारक मोक्षदायी अनन्त- जन्ममृत्युभयचक्रनाशक ।
शान्त-स्थिर-गुणालङ्कारं भूषयित्वा श्री श्री जयन्त मम देहि करावलम्बम् ॥ ५ ॥
अर्थ : संसारबंधनातून मुक्त करून मोक्ष प्रदान करणार्या, जन्म-मृत्यूच्या न संपणार्या भयचक्राचा नाश करणार्या, शांत अन् स्थिर असे गुणरूपी अलंकार भूषवून हे श्री श्री जयंत, मला आपल्या हातांनी आधार द्या. (माझे रक्षण करा.)
जगदोद्धारक जनार्दन चक्रपाणे सर्वशुभचिह्नाङ्कित कोमलाङ्गे ।
साक्षात् परमेश्वर त्वं पापहारी श्री श्री जयन्त मम देही करावलम्बम् ॥ ६ ॥
अर्थ : जगताचा उद्धार करणार्या हे जनार्दना, चक्रपाणि, सर्व शुभचिन्हांनी युक्त कोमल अंगकांती असलेले, पाप हरण करणारे आपण साक्षात् परमेश्वरच आहात. हे श्री श्री जयंत, मला आपल्या हातांनी आधार द्या. (माझे रक्षण करा.)
श्री श्री जयन्त-स्तोत्रं पुण्यं य: पठेत् भक्तिसंयुतेन ।
श्री जयन्त-कृपा लभते सदा विष्णुसायुज्यमाप्नुयात् ॥ ७ ॥
अर्थ : हे पुण्यकारक असे श्री श्री जयंत-स्तोत्र जो भक्तीभावाने पठण करील, त्याला श्री जयंत-कृपा सदैव लाभेल आणि श्रीविष्णूचे सान्निध्य प्राप्त होईल.
– श्री. देवेन पाटील, देहली (५.७.२०१९)