भारतातील सर्व मुसलमानांनी हिंदु धर्म स्वीकारावा !
चित्रपट समीक्षक कमाल राशिद खान उपाख्य केआर्के यांचा सल्ला !
मुंबई – चित्रपट समीक्षक कमाल राशिद खान उपाख्य के.आर्.के. यांनी एक ट्वीट करून भारतातील मुसलमानांना हिंदु धर्म स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे. के.आर्.के. यांनी म्हटले आहे की, मी भारताच्या सर्व मुसलमानांना सल्ला देतो की, त्यांनी धर्मांतर करून हिंदु व्हावे; कारण तुमचे कुटुंब आणि मुले यांचे जीवन कोणत्याही धर्मापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. अरब भारतीय मुसलमानांना धर्मांतरित मुसलमान समजतात. आता अरब देशांना इस्लामचे संरक्षण करण्यास कठीण जाऊ लागले आहे. यामुळेच मुसलमानांनी आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी पुन्हा धर्मांतर करणे चुकीचे नाही.