सातारा जिल्हा परिषदेतील सुरक्षारक्षकाला मारहाण !
सातारा, ३ ऑगस्ट (वार्ता.) – सातारा जिल्हा परिषद येथे राजकीय कार्यकर्त्यांची गुंडगिरी वाढत असून २ ऑगस्ट या दिवशी एकाने सुरक्षारक्षकाला मारहाण केली. जिल्हा परिषद परिसरात वाहन लावण्यावरून हा प्रकार घडला. तरीही काही राजकीय कार्यकर्ते जिल्हा परिषदेच्या दरवाजातच वाहने लावून जातात. सुरक्षारक्षक येणार्या नागरिकांना मोकळ्या जागेत वाहने लावण्यासाठी सांगतात. यामुळे वादाचे प्रसंग उद़्भवतात.
सातारा जिल्हा परिषद परिसरामध्ये वाहने उभे करण्यासाठी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेमधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी वेगळे वाहनतळ असून विविध कामांसाठी येणार्या नागरिकांचे वाहन तळ वेगळे करण्यात आले आहे; मात्र येणारे नागरिक जागा मिळेल तेथे वाहने लावतात. २ ऑगस्ट या दिवशी काहीसा असाच प्रकार घडला.