ज्ञानतपस्‍वी प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांना ‘जीवन गौरव’ पुरस्‍कार घोषित !

पुणे येथील माधवराव पटवर्धन सभागृहात ६ ऑगस्‍टला कार्यक्रम !

पुणे, ३ ऑगस्‍ट (वार्ता.) – ज्ञानतपस्‍वी प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांच्‍या मराठी भाषेतील वाङ्‌मय सेवेचा गौरव करण्‍यात यावा, या उद्देशाने त्‍यांच्‍या ९२ व्‍या वाढदिवसाला ‘जीवन गौरव’ पुरस्‍कार सन्‍मानपूर्वक प्रदान करण्‍यात येणार आहे. ६ ऑगस्‍ट २०२३ या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता टिळक रस्‍त्‍यावरील महाराष्‍ट्र साहित्‍य परिषदेच्‍या ‘माधवराव पटवर्धन’ सभागृहात गौरव समितीच्‍या विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. त्‍यांचा आधुनिक विज्ञान आणि भारतीय तत्त्वज्ञान यांचा गाढा अभ्‍यास आहे. कानडी भाषिक असूनही त्‍यांनी मराठी भाषेत विविध विषयांवर विपुल लेखन केले आहे. नागपूरहून प्रकाशित होणार्‍या ‘प्रज्ञालोक’ या त्रैमासिकात गेल्‍या २५ वर्षांपेक्षा अधिक काळ त्‍यांचे लेख प्रसिद्ध होत असतात. ११ डिसेंबर २०२२ या दिवशी भोज येथे झालेल्‍या तिसर्‍या कन्‍नड साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्षपद त्‍यांनी भूषवले आहेत. तसेच करवीरपिठाचे जगद़्‍गुरु शंकराचार्य विद्याशंकर भारती यांच्‍या शुभहस्‍ते त्‍यांचा सत्‍कार झाला आहे.

६ ऑगस्‍ट या दिवशी संत साहित्‍याचे गाढे अभ्‍यासक डॉ. अशोक कामत, पूर्णवाद याचे अभ्‍यासक डॉ. लक्ष्मीकांत पारनेरकर, महाराष्‍ट्र साहित्‍य परिषदेचे अध्‍यक्ष आणि मराठीचे डॉ. मिलिंद जोशी अन् रमल विद्या प्रवीण श्री. चंद्रकांत शेवाळे विशेष अतिथी म्‍हणून उपस्‍थित रहाणार आहेत.

 विविध विषयांचा अभ्‍यास !

बुद्धीप्रामाण्‍यवाद, नियतीवाद, कर्मफल, विधीलिखित या सर्वांचा समग्र संबंध आहे काय ? ‘क्‍वांटम’ सिद्धांताने आधुनिक भौतिकशास्‍त्रीय चिकित्‍सेची दालने कशी उघडी केली आहेत ? भानामतीचे खेळ कोण करतो ? मृतात्‍मे  भुते खरी असतात का ? यू.एफ्.ओ. म्‍हणजे उडत्‍या तबकड्यांचे रहस्‍य काय ? शून्‍यातून वस्‍तू निर्मिती होते काय ? पुनर्जन्‍म मानायचा का ? अतींद्रिय शक्‍ती असतात का ? देवदूत असतात का ? गणपतीचा चमत्‍कार कसा होतो ?