मिरजेत ५ ऑगस्टला शरद पोंक्षे राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेणार !
मिरज – ज्येष्ठ अभिनेते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे पुरस्कर्ते श्री. शरद पोंक्षे हे ‘महाराष्ट्रातील सद्य राजकीय परिस्थिती’ यावर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री. भाऊ तोरसेकर, श्री. सुशील कुलकर्णी आणि श्री. प्रभाकर सूर्यवंशी यांची जाहीर मुलाखत बालगंधर्व नाट्यमंदिर येथे ५ ऑगस्टला सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. या प्रसंगी श्री. भाऊ तोरसेकर लिखित ‘कोरी पाटी’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. याचे आयोजन ‘श्रीराम सेवा संस्थे’च्या वतीने करण्यात आले असून याचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.