नूंहमध्ये २ मशिदींवर पेट्रोल बाँब फेकून लावण्यात आली आग !
नूंह (हरियाणा) – नूंहमधील हिंसाचारानंतर हरियाणातील अन्य जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना चालूच आहेत. २ ऑगस्टच्या रात्री नूंह जिल्ह्यातील तावडू येथे २ मशिदींना आग लावण्यात आली. या घटनेनंतर येथे तणाव निर्माण झाला असून मोठ्या संख्येने येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दुचाकींवरून आलेल्या आक्रमणकर्त्यांनी पेट्रोल बाँबद्वारे या मशिदींवर आक्रमण केले. यामुळे येथे आग लागली. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. या मशिदींची थोडीफार हानी झाली. यांसह आक्रमणकर्त्यांनी पलवल जिल्ह्यातील मीनार गेट बाजारात बांगड्यांच्या दुकानाला आग लावली.
संपादकीय भूमिका‘अशा प्रकारच्या घटना घडवून हिंदूंना अपकीर्त करण्यामागे धर्मांध मुसलमान आहेत का ?’, याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे ! |