सर्वांनी शांतता राखावी ! – हरियाणातील नूंह येथील हिंसाचारावर अमेरिकेची प्रतिक्रिया

मॅथ्यू मिलर

वॉशिंग्टन  (अमेरिका) – हरियाणामधील नूंह येथे धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणाविषयी अमेरिकेनेही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी म्हटले की, आम्हाला याविषयी ठाऊक नव्हते. अमेरिकेतील लोकांकडून याविषयी माहिती मिळाली. त्यानंतर भारतातील अमेरिकेच्या दूतावासाशी संपर्क साधून माहिती घेतली. आम्ही नेहमीप्रमाणेच शांतता राखण्याचे आवाहन करत आहोत. भारतातील संबंधित गटांनी या हिंसाचारापासून दूर रहावे, असे आवाहन मिलर यांनी केले.