(म्हणे) ‘संभाजी भिडेंचे पाय तोडल्यास २ लाख रुपये देणार !’
एम्.आय.एम्.चे शहर युवक अध्यक्ष मोहसीन मैंदर्गीकर यांची विखारी घोषणा
सोलापूर – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी म. गांधी यांच्याविषयी अवमान करणारे वक्तव्य केल्याचा काँग्रेसने आरोप केला आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी एम्.आय.एम्. पक्षाचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. या वेळी ‘वारंवार महापुरुषांचा अपमान करणे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. भिडे हे नथुराम गोडसे याची औलाद आहेत. कुणी भिडे यांचे पाय तोडून आणेल, त्यांना मी २ लाख रुपये देईन’, अशी घोषणा सोलापूर एम्.आय.एम्.चे शहर युवक अध्यक्ष मोहसीन मैंदर्गीकर यांनी केली. (पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्याविषयी अशी कायदा हातात घेण्याची भाषा करणार्यांविरुद्ध पोलीस काय कारवाई करणार आहेत ? – संपादक)