गोवा येथील शास्त्रीय गायक श्री. गौरीश तळवलकर यांनी केलेल्या शास्त्रीय गायनाचे सूक्ष्म परीक्षण !
‘२५.६.२०२३ या दिवशी रामनाथी (गोवा) येथे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने गोवा येथील श्री. गौरीश तळवलकर यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचे देवाने माझ्याकडून सूक्ष्म परीक्षण करवून घेतले. ते पुढे दिले आहे.
१. श्री. गौरीश तळवलकर यांच्या गायनातून वातावरणात सात्त्विक लहरींचे प्रक्षेपण होत होते. त्यामुळे मला माझ्या अनाहतचक्राच्या ठिकाणी चांगल्या संवेदना जाणवत होत्या.
२. श्री. तळवलकर रागातील स्वर आर्ततेने आळवत होते. त्या वेळी मला मिळणार्या आनंदात आणखी वाढ होत होती.
३. गायन चालू असतांना श्री सरस्वतीदेवीचे अस्तित्व काही वेळ जाणवले.
४. गायनात राग ‘यमन’ चालू असतांना त्यात ‘नादब्रह्म गुणसागर’ असे शब्द अधूनमधून होते. नादब्रह्म, म्हणजे नादातील ब्रह्म किंवा आनंद होय. श्री. तळवलकर यांच्या गायनातून नादब्रह्माची, म्हणजेच आनंदाची अनुभूती मला येत होती.
५. श्री. तळवलकर यांचे गायन चालू असतांना त्यांच्या शरिराच्या भोवतीची दैवी आभा हळूहळू मोठी होतांना मला सूक्ष्मातून दिसली.
६. श्री. तळवलकर यांनी ‘नादब्रह्म गुणसागरको’ हे गायन सादर केले. त्या वेळी वातावरणात सूक्ष्मातून पांढर्या रंगाचे दैवी कण निर्माण झाले. त्यानंतर त्यांनी ‘रंग दे, रंग दे, रंगरेजवा ।’ हे गायन सादर केले. त्या वेळी वातावरणात सूक्ष्मातून विविध रंगी दैवी कण निर्माण झाले.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.६.२०२३)
|