सनातनच्या ७१ व्या संत पू. (कै.) श्रीमती आशा दर्भेआजी (वय ९४ वर्षे) यांच्या देहत्यागापूर्वी आणि देहत्यागानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती
पू. (कै.) श्रीमती आशा दर्भेआजी यांच्या देहत्यागानंतरचा तेरावा दिवस आहे. त्या निमित्ताने…
२२.७.२०२३ या दिवशी सनातनच्या ७१ व्या संत पू. (श्रीमती) आशा दर्भेआजी यांनी कोल्हापूर येथे देहत्याग केला. ३.८.२०२३ या दिवशी पू. आजींच्या देहत्यागानंतरचा तेरावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या देहत्यागापूर्वी आणि देहत्यागानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
(भाग १)
१. श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी (पू. आजींची मुलगी, वय ७३ वर्षे), फोंडा, गोवा.
१ अ. पू. आईंच्या देहत्यागाच्या १ मास आधी त्यांना भेटायला गेल्यावर जाणवलेली सूत्रे
१. ‘पू. (श्रीमती) आशा दर्भेआजी कोल्हापूर येथे रहात होत्या. त्यांचे वय झाल्यामुळे त्या काही दिवस झोपून होत्या. मी जून २०२३ मध्ये पू. आईंना भेटायला गेले होते. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘तुम्ही पुष्कळ पुण्यवान आहात. मला तुमची आठवण येते.’’ (मी आणि माझी मुलगी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत असल्याने पू. आई तसे म्हणाल्या.)
२. त्यानंतर मी गोवा येथे आले. नंतर एकदा पहाटे मला एक स्वप्न पडले. स्वप्नात पू. आईंनी मला ‘तुझे सर्व चांगले होईल’, असा आशीर्वाद दिला.
१ आ. साधिकेला स्वप्नात ती केवळ पांढरा भात खात असल्याचे दिसणे, स्वप्न चांगले न वाटणे आणि त्याच दिवशी पू. आजींची स्थिती गंभीर असल्याचे मुलाने कळवणे : ७.७.२०२३ या दिवशी सकाळी मला एक स्वप्न पडले. मला स्वप्नात दिसले, ‘मी केवळ पांढरा भात खात आहे.’ ते स्वप्न मला चांगले वाटले नाही. त्याच दिवशी सकाळी ९.३० वाजता माझ्या मुलाचा (श्री. अमित अनंत कुलकर्णी याचा) भ्रमणभाष आला. त्याने सांगितले, ‘‘पू. आजींची स्थिती गंभीर असून तुम्ही दोघी गोव्याहून लगेच निघालात, तर बरे होईल.’’ आम्ही (मी आणि माझी मुलगी (अश्विनी अनंत कुलकर्णी) त्वरित गोव्याहून कोल्हापूरला जायला निघालो.
१ इ. आम्ही प्रवासात सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला ‘निर्गुण’ हा नामजप करत होतो.
१ ई. कोल्हापूर येथे जात असतांना गाडीजवळून फुलपाखरू, मुंगूस, गाय आणि वासरू अन् भारद्वाज पक्षी जाणे आणि ‘भगवंत शुभसंदेश देत आहे’, असे वाटणे : आम्ही कोल्हापूर येथे जात असतांना आमच्या गाडीच्या दिशेने एक फुलपाखरू उडत आले. काही अंतर गेल्यावर एक मुंगूस आडवे गेले. त्यानंतर एक गाय आणि वासरू गाडीच्या समोरून गेले. आम्ही कोल्हापूरच्या जवळ आलो, तेव्हा एक भारद्वाज पक्षी समोर आला. हे पाहून ‘भगवंत काहीतरी शुभसंकेत देत आहे’, असे आम्हाला वाटले.
१ उ. पू. आईंच्या देहत्यागापूर्वी त्यांच्यासाठी नामजप करतांना जाणवलेली सूत्रे
१ उ १. ७.७.२०२३ या दिवशी जाणवलेले सूत्र
१ उ १ अ. पू. आई बेशुद्धावस्थेत असणे, पू. आईंच्या शेजारी बसून सद़्गुरु डॉ. गाडगीळ यांनी सांगितलेला ‘निर्गुण’ हा नामजप करणे आणि त्या वेळी खोलीत दाब न जाणवणे : ७.७.२०२३ या दिवशी आम्ही कोल्हापूर येथे गेलो. तेव्हा पू. आई बेशुद्धावस्थेत होत्या. त्या कशालाच प्रतिसाद देत नव्हत्या. ४ दिवसांपूर्वी त्या पलंगावर बसल्या असतांना त्यांचा तोल गेला आणि त्या पलंगाच्या कठड्यावर आपटल्या. त्यांना तोंडाच्या उजव्या बाजूला मार लागला होता. त्यामुळे त्यांचा उजवा गाल काळसर दिसत होता. आम्ही त्यांच्या स्थितीविषयी सद़्गुरु गाडगीळकाकांना सांगितले. तेव्हा त्यांनी आम्हाला ‘निर्गुण’ हा नामजप करायला सांगितला. आम्ही पू. आईंच्या शेजारी बसून नामजप केला. त्या वेळी आम्हाला पू. आईंच्या खोलीत दाब जाणवला नाही.
१ उ २. ८.७.२०२३ या दिवशी जाणवलेली सूत्रे
१ उ २ अ. पू. आईंच्या चेहर्यात पालट दिसणे आणि त्यांच्याकडे पाहून शांत वाटणे : दुसर्या दिवशी, म्हणजे ८.७.२०२३ या दिवशी पू. आईंच्या तोंडावरील काळसरपणा उणावला आणि त्यांच्या चेहर्यात पालट दिसू लागला. मला पू. आईंकडे पाहिल्यावर शांत वाटत होते. ‘त्या देवाच्या अनुसंधानात आहेत’, असे मला जाणवत होते.
१ उ २ आ. मला आणि अश्विनीला पू. आईंच्या खोलीत असतांना एखाद्या निर्वात पोकळीत बसल्याप्रमाणे वाटत होते अन् आमचा नामजप पुष्कळ एकाग्रतेने होत होता.
१ उ २ इ. नामजप करतांना ‘देवता पांढरी फुले पू. आईंच्या डोक्याच्या बाजूला वहात आहेत’, असे दिसणे आणि ‘पू. आईंकडून पुष्कळ शक्ती अन् चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवणे : त्या वेळी नामजप करत असतांना मला दिसले, ‘पू. आई पलंगावर झोपल्या आहेत. त्यांच्या डोक्याकडील बाजूस श्री महालक्ष्मीदेवी, शिव-पार्वती आणि एक देवी (‘ती देवी कोणती होती ?’, हे मला समजले नाही.) उभी आहे. देवतांनी हातांत पांढरी फुले घेतली आहेत. त्या सर्व देवतांनी ती फुले पू. आईंच्या डोक्याच्या बाजूला वाहिली.’ (पू. आईंचा कुलदेव श्री महादेव आणि कुलदेवी श्री महालक्ष्मी आहे.) त्या वेळी ‘पू. आईंकडून पुष्कळ चैतन्य आणि शक्ती प्रक्षेपित होत आहे’, असे मला अन् अश्विनीला जाणवले.
१ उ २ ई. त्यानंतर काही वेळाने आम्हाला शांतीची स्पंदने जाणवत होती. आम्हा दोघींनाही ‘त्या स्थितीतून बाहेर पडू नये’, असे वाटत होते.
१ उ २ उ. पू. आईंच्या खोलीतून बाहेर आल्यावर आनंद जाणवणे आणि त्यांच्यासाठी नामजपाची सेवा करून घेत असल्याबद्दल परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होणे : पू. आईंच्या खोलीतून बाहेर आल्यावर आम्हा दोघींनाही पुष्कळ आनंद जाणवत होता. त्या वेळी ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव पू. आईंसाठी नामजपाची सेवा करून घेऊन त्या माध्यमातून आमची साधना करून घेत आहेत आणि आम्हाला आनंद देत आहेत’, असे आम्हाला जाणवले अन् आमच्याकडून त्यांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.
१ उ ३. १२.७.२०२३ या दिवशी आलेली अनुभूती
१ उ ३ अ. सूक्ष्मातून ‘पू. आईंच्या खोलीतील भूमीवर लाल कमळे पसरली आहेत’, असे दिसणे, ‘मध्यभागी असलेल्या पांढर्या कमळावर पू. आई झोपल्या आहेत’, असे जाणवणे आणि त्यांच्याकडे पाहून मन स्थिर अन् शांत होणे : मी सद़्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेला ‘निर्गुण’ हा नामजप करत होते. तेव्हा मला सूक्ष्मातून पू. आईंच्या खोलीतील भूमीवर लाल रंगाची कमळे पसरलेली दिसत होती. त्या कमळांच्या मध्यभागी एक पांढर्या रंगाचे कमळ होते. ‘त्या कमळावर पू. आई झोपल्या आहेत’, असे मला जाणवले. त्या वेळी त्यांच्याकडे पाहून माझे मन स्थिर आणि शांत झाले. तेव्हा ‘त्या स्थितीतून बाहेर येऊ नये’, असे मला वाटले.
१ उ ४. १३.७.२०२३ या दिवशी जाणवलेली सूत्रे
अ. पू. आईंजवळ बसून ‘महाशून्य’ हा नामजप करतांना मला दिसले, ‘पू. आईंच्या डोक्याच्या बाजूला सूक्ष्मातून शिव एका पायावर उभा राहिला आहे. पू. आईंच्या आज्ञाचक्रावर भस्माचे ३ पट्टे ओढले आहेत.’ त्या वेळी माझा नामजप पुष्कळ गतीने होत होता.
आ. ‘पू. आईंचा श्वास अत्यंत संथ गतीने चालू आहे. पू. आई केवळ देहाने येथे असून त्यांचा पुढचा प्रवास चालू झाला आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी मला शांतीची स्पंदने जाणवली. मी प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.
आम्ही सद़्गुरु गाडगीळकाकांना पू. आईंच्या स्थितीविषयी सांगितले. तेव्हा त्यांनी आम्हाला पू. आईंसाठी करत असलेला नामजप बंद करायला सांगून प्रार्थना करायला सांगितल्या.
१ ऊ. १४.७.२०२३ या दिवशी वैयक्तिक नामजप करतांना जाणवलेली सूत्रे
१. १४.७.२०२३ या दिवशी पू. आईंच्या खोलीत बसून वैयक्तिक नामजप करत असतांना मला सूक्ष्मातून ‘नृसिंहवाडीचे दत्त महाराज, जगद़्गुरु आद्य शंकराचार्य आणि संत मीराबाई हे पू. आईंच्या बाजूला बसले आहेत’, असे दिसले.
२. ‘पू. आईंची समष्टी स्तरावरची साधना चालू आहे’, असे मला वाटत होते.
३. माझा नामजप भावपूर्ण होत होता आणि नंतर मला शक्तीची स्पंदने जाणवली.’
(क्रमशः)
(सर्व सूत्रांचा दिनांक : २७.७.२०२३)
|
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/707792.html