केरळ विधानसभेचे अध्यक्ष ए.एन्. शमसीर यांचा वाशी येथे निदर्शनांद्वारे निषेध !
हिंदु धर्मविरोधी वक्तव्याचे प्रकरण !
नवी मुंबई, २ ऑगस्ट (वार्ता.) – केरळ विधानसभेचे अध्यक्ष ए.एन्. शमसीर यांनी हिंदु धर्माच्या विरोधात वक्तव्य केले होते. या निषेधार्थ नवी मुंबईतील ‘हिंदू स्वाभिमान संरक्षण समिती’च्या वतीने वाशी येथील केरळ भवनाच्या समोर निदर्शने करण्यात आली. या वेळी शमसीर यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. विविध हिंदु संघटना आणि मंदिर संघटना यांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.
(म्हणे) ‘गजमुख असलेला भगवान श्री गणेश ही केवळ एक दंतकथा !’-ए.एन्. शमसीर यांची गरळओक
https://t.co/WPLGF5xgX4केरळ विधानसभेचे धर्मांध सभापती ए.एन्. शमसीर यांची गरळओक.@ShamseerAN
— THE CYBER COBRA (24x7x365 MEDIA ) (@eCyberCobra) July 26, 2023
‘श्री गणेश हे एक मिथक (दंतकथा) आहे, हिंदु पुराणे अंधश्रद्धा पसरवत आहेत’, अशी वक्तव्ये शमसीर यांनी केली आहेत.
संपादकीय भूमिका :हिंदूंनो, हिंदु धर्माची विटंबना करणार्यांना कठोर शिक्षा होईपर्यंत सनदशीर मार्गाने लढा चालूच ठेवा ! |