सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्‍य मार्गदर्शन !

‘सद़्‍गुरु स्‍वातीताई (सद़्‍गुरु स्‍वाती खाडये) आमच्‍या व्‍यष्‍टी साधनेचा आढावा घेतात. त्‍या वेळी त्‍यांनी केलेले साधनेविषयीचे मार्गदर्शन पुढे दिले आहे.

सद्गुरु स्वाती खाडये

१. नामजप करतांना, स्‍वयंसूचना देतांंना किंवा स्‍वतःभोवतालचे अनिष्‍ट शक्‍तीचे आवरण काढतांना ‘आपण गुरुदेवांच्‍या चरणांखालील पायपुसणे आहोत, गुरुदेवांच्‍या खोलीतील लादी आहोत किंवा गुरुदेवांच्‍या चरणांखालील पायथळ (पाय ठेवण्‍यासाठीचा पाट) आहोत’, अशा प्रकारे भाव ठेवून दिवसभर प्रयत्न केल्‍याने आपल्‍याला पुष्‍कळ लाभ होतो आणि आपली प्रत्‍येक कृती भावपूर्ण होेते.

सौ. ज्‍योती दाते

२. एखादी चूक वारंवार होत असल्‍यास तिच्‍यावर लगेच शिक्षापद्धतीचा अवलंब करावा. त्‍यामुळे आपल्‍यामध्‍ये चुकांविषयी गांभीर्य निर्माण होऊन आपले साधनेचे प्रयत्न वाढतील.’

– सौ. ज्‍योती दाते (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.११.२०२२)