शिबिरासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येतांना साधिकेला झालेला त्रास आणि आश्रमात आलेल्या अनुभूती
‘ऑगस्ट २०२२ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एक शिबिर होते. या शिबिराला येतांना मला झालेला त्रास आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. रत्नागिरीहून गोव्याला आश्रमात येतांना प्रवासात मानसिक त्रास होणे आणि सनातनच्या तिन्ही गुरूंचे स्मरण केल्यावर त्रास उणावणे
रामनाथी आश्रमात येत असतांना प्रवासात माझ्या मनात अनावश्यक विचार येणे, दचकायला होणेे इत्यादी त्रास होत होते. माझ्या मानसिक त्रासांतही वाढ झाली होती. त्या दिवशी गुरुवार होता. भक्तीसत्संग ऐकत असतांना देवाने मला सुचवले, ‘सत्संगाच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत झाले आहे. त्यामुळे आपण सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या तिन्ही गुरूंना आळवूया.’ तिन्ही गुरूंचे स्मरण करू लागल्यावर माझा त्रास न्यून होऊ लागला.
२. आश्रमात आलेल्या अनुभूती
अ. पहिल्या दिवशी माझ्याकडून अर्धा घंटा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप एकाग्रतेने झाला. यापूर्वी इतक्या एकाग्रतेने माझा नामजप कधीच झाला नव्हता. त्यानंतर मला शांत आणि समाधानी वाटत होते.
आ. शिबिराच्या आरंभी ध्यानमंदिरात शंखनाद करण्यात आला. तेव्हा मला हलकेपणा जाणवला.
इ. अन्य वेळी मी बराच वेळ आसंदीवर बसले, तर माझे पाय दुखतात; मात्र शिबिरात सलग ३ दिवस आसंदीवर बसूनही मला काहीच त्रास झाला नाही.
ई. पूर्ण शिबिरात माझे मन शांत होते.’
– कु. दीप्ती चिंचळकर, रत्नागिरी (८.८.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |