रक्षाबंधनाच्या वेळी मुसलमान महिलांना भेटा !
पंतप्रधान मोदी यांचे भाजप आघाडीच्या खासदारांना आवाहन
नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप आघाडीच्या खासदारांची १ ऑगस्ट या दिवशी भेट घेतली. त्या वेळी त्यांनी येत्या रक्षाबंधनाच्या वेळी मुसलमान महिलांना भेटण्यास सांगितल्याचे वृत्त ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, बैठकीला उपस्थित काही खासदारांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी समाजातील प्रत्येक घटकाशी संपर्क साधण्याचा आग्रह धरला. पंतप्रधान मोदी यांनी तिहेरी तलाकवर बंदी घालण्याच्या निर्णयावरही चर्चा केली. या निर्णयामुळे मुसलमान महिलांना मोठा दिलासा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी झालेल्या आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमातही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते की, सरकारच्या हज धोरणात पालट झाल्यानंतर हजला जाणार्यांची संख्या वाढली आहे. यावर्षी ४ सहस्र मुसलमान महिलांनी ‘महरम’ (पती किंवा पुरुष नातेवाईक यांच्याखेरीज) हज यात्रा केली.
#PMModi Asks BJP MPs To Celebrate #RakshaBandhan With Muslim Womenhttps://t.co/OMcOusKXR6
— TIMES NOW (@TimesNow) August 2, 2023