राजस्थानमधील काँग्रेसचे निलंबित मंत्री राजेंद्र गुढा यांनी सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराची माहिती केली सार्वजनिक !
जयपूर (राजस्थान) – राजस्थानच्या काँग्रेस सरकारमधील निलंबित करण्यात आलेले मंत्री राजेंद्र गुढा यांनी २ ऑगस्ट या दिवशी येथे पत्रकार परिषद घेऊन सरकार करत असलेल्या भ्रष्टाचाराची माहिती दिली. त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या ‘लाल डायरी’तील ३ पाने सार्वजनिक केली. गुढा यांनी दावा केला की, या पानांमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय नेते आणि ‘राजस्थान पर्यटन विकास निगम’चे अध्यक्ष धर्मेंद्र राठोड, गेहलोत यांचे पुत्र आणि ‘राजस्थान क्रिकेट असोसिएशन’चे सचिव भवानी सामोता यांच्यात झालेल्या भ्रष्टाचाराचा उल्लेख आहे.
या वेळी गुढा म्हणाले की, मी एका रणनीतीच्या अंतर्गत टप्प्याटप्प्याने सरकारने केलेला भ्रष्टाचार उघड करीन. सरकारकडून मला धमकावले जात आहे. जर मला कारागृहात डांबण्यात आले, तर भ्रष्टाचाराची माहिती देणार्या ‘लाल डायरी’तील सूत्रे माझी विश्वासू व्यक्ती नियमितपणे उघड करत राहील. त्यामुळे राजस्थान सरकार कोसळेल.
संपादकीय भूमिका
|