डॉ. आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्‍थेतील विद्यार्थ्‍यांना प्रशिक्षण देण्‍याचा प्रस्‍ताव विचाराधीन ! – शंभूराज देसाई, मंत्री

मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, २ ऑगस्‍ट (वार्ता.) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण या संस्‍थेतील (‘बार्टी’) या संस्‍थेकडून इयत्ता १० वीमध्‍ये ९० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्‍या ३६ जिल्‍ह्यांतील पहिल्‍या ३ मुली आणि ३ मुले यांना अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रशिक्षण आणि अर्थसाहाय्‍य देण्‍याचा प्रस्‍ताव शासनाच्‍या विचाराधीन आहे. तत्‍कालीन मुख्‍यमंत्र्यांच्‍या सूचनेनुसार हा प्रस्‍ताव सिद्ध केला आहे. तो प्रस्‍ताव मंत्रीमंडळासमोर लवकर पाठवला जाईल. त्‍या प्रस्‍तावाला मान्‍यता मिळण्‍यासाठी प्रयत्न करू. मुले आणि मुली यांना प्रशिक्षण देण्‍यासाठी लवकर कार्यवाही केली जाईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी २ ऑगस्‍ट या दिवशी विधान परिषदेत प्रश्‍नोत्तरात दिली. सदस्‍य रमेश कराड यांनी हा प्रश्‍न विचारला होता.