सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची गळफास घेऊन आत्महत्या
कर्जत – सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई (वय ५८ वर्षे) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्जत येथील त्यांच्या एन्.डी. स्टुडिओमध्येच त्यांनी आत्महत्या केली. स्वच्छता कर्मचारी खोलीत गेले असतांना ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना कळवले. पोलीस तातडीने घटनास्थळी आले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी भव्य-दिव्य देखावे (सेट) उभारले होते. त्यांनी अनेक दिग्गज दिग्दर्शकांसमवेत काम केले होते. त्यांच्यावर २४९ कोटींचे कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. ठराविक मुदतीसाठी घेतलेले कर्ज न फेडल्यामुळे नितीन देसाई यांच्या स्टुडिओवर जप्तीची कारवाई होणार होती. त्यांनी या संदर्भात खालापूरचे आमदार महेश बालदी यांच्याकडे काही दिवसांपूर्वीच चर्चा केली होती.