आतंकवादाचे नवे स्वरूप !
संपादकीय
हरियाणातील नूंहमध्ये जे घडले, ते हिंदूंना अस्वस्थ करणारे आहे. तसे भारतात जिहाद्यांकडून हिंदूंवर आक्रमण करणे, दंगली करणे या गोष्टी काही नवीन नाहीत; मात्र नूंहमध्ये जिहाद्यांकडून जो हिंसाचार घडवला गेला, तो नियोजनबद्ध होताच. त्याही पुढे जाऊन ही घटना जिहाद्यांची हिंसाचार घडवण्याची पूर्वसिद्धता आणि आक्रमकता यांवर प्रकाश टाकणारी आहे. काही हिंदूंच्या मते या दंगलीचे नियोजन ६ मासांपूर्वीच करण्यात आले होते. या दंगलीत जिहाद्यांकडून ‘एके ४७’ रायफलींमधून गोळीबार करण्यात आला. भारतात दंगलखोर तलवारी, दगड आणि अन्य शस्त्रांचा वापर करतात; मात्र आता त्यांच्याकडे एके ४७ रायफल मिळत असेल, तर हे केवळ दंगलखोर नव्हेत, तर ते आतंकवादी आहेत. या दंगलीत हत्या करण्यात आलेले बजरंग दलाचे कार्यकर्ते अभिषेक राजपूत यांच्यावर प्रथम गोळीबार करण्यात आला. त्यानंतर गळा चिरून त्यांना दगडांनी ठेचण्यात आले. ही पद्धत तालिबानी आतंकवादी वापरतात. इस्लामिक स्टेटचा उदय झाल्यानंतर त्याने जगात दहशत निर्माण करण्यासाठी लोकांचे गळा चिरण्याचे असे अनेक व्हिडिओ प्रसारित केले होते. जे आतंकवादी करतात, तेच नूंहमध्ये दंगलखोरांकडून करण्यात आले. यावरून लक्षात येते की, आतंकवाद्यांनी रणनीती पालटली आहे. भारतातील हिंदूंना संपवायचे आहे; मात्र त्यासाठी यापुढे पद्धत वेगळी असेल. पूर्वी काश्मीर आणि अन्य ठिकाणी बाँबस्फोट घडवून हिंदूंची हत्या करणे, असे प्रकार घडत असत. आता ठिकठिकाणी दंगली घडवणे, हिंदूंच्या मालमत्तेची हानी करणे, त्यांचा शिरच्छेद करणे अशी कुकृत्ये करून हिंदूंमध्ये दहशत निर्माण करण्याचा नवा प्रकार सध्या घडत आहे. नूंह दंगलीवर यापुढे काही काळ चर्चा होईल; मात्र आतंकवाद्यांची ही नवी चाल उधळून लावण्यासाठी सरकारी यंत्रणा सिद्ध आहे का ?
नूंह येथील ब्रिजमंडल यात्रेत सहभागी होण्यासाठी आलेले भाविक उत्साही होते, तेथील शिवमंदिराच्या परिसरात साधारण ५-६ सहस्र भाविक उपस्थित असल्याचा अंदाज आहे. या मंदिराच्या चारही बाजूला डोंगर आहेत. या डोंगराळ भागातून भाविकांवर दगडफेक आणि गोळीबार करण्यात आला. या आक्रमणात हिंदूंच्या १५० च्या जवळपास गाड्या जाळण्यात आल्या, तसेच हिंदूंची दुकानेही जाळण्यात आली. यासाठी लागणारे इंधन कुठून आले ? या आक्रमणातून वाचण्यासाठी भाविकांनी मंदिरात आश्रय घेतला. तरीही जिहाद्यांकडून गोळीबार आणि दगडफेक चालू होती. एका वृत्तानुसार मंदिरात अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी ७ घंटे लागले. याचा अर्थ जिहाद्यांकडे असलेला शस्त्रास्त्रांचा साठा किती मोठ्या प्रमाणात होता, हे स्पष्ट होते. या दंगलीतून जिहाद्यांना जे साध्य करायचे होते, ते त्यांनी साध्य केले आहे. आता जिहाद्यांना अटक होईल. त्यांच्यावरील खटले वर्षानुवर्षे चालतील, तोपर्यंत त्यांना जामीनही मिळेल. पुढे काय ? ‘या दंगलीत आपले सर्वस्व गमावलेल्या हिंदूंनी काय करायचे ?’, ‘ज्यांची दुकाने जाळली, त्यांच्या उत्पन्नाचे साधन नष्ट झाले. त्यांनी पुढील आयुष्यात उभे कसे रहायचे ?’, ‘त्यांना न्याय मिळणार का ?’, हे आणि असे अनेक प्रश्न न सुटणारे आहेत.
रणनीती पालटा !
जिहाद्यांच्या कारवाया लक्षात घेऊन सुरक्षायंत्रणांनी त्यांची रणनीती पालटली आहे का ? दंगलीची दाहकता लक्षात घेता, त्याची पूर्वसिद्धता आधीपासून झाली होती, हे कुणीही सांगू शकेल. असे असतांना गुप्तचर विभाग काय करत होता ? दंगली घडवणार्यांपर्यंत एके ४७ रायफली कशा पोचल्या ? एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्या आणि दुकाने जाळण्यासाठी जिहाद्यांना इंधन कुणी पुरवले ? दंगल झाल्यानंतर ही माहिती पुढे येईल; मात्र ती आधीच पोलिसांना का मिळाली नाही ? हिंदूंना साधी सभा आयोजित करायची झाल्यावर पोलीस ‘त्याला कोण उपस्थित असणार ? त्यात किती जण सहभागी होणार ?’, आदी विविध प्रश्न विचारून सभा, कार्यक्रम किंवा मिरवणूक यांचे आयोजन करणार्यांना भंडावून सोडतात. अशीच चौकशी मुसलमानांची का करण्यात येत नाही ? त्यांच्या हालचालींवर लक्ष का ठेवले जात नाही ? सुरक्षायंत्रणा सतर्क नसतात; म्हणून दंगली घडतात.
केवळ नूंहच नव्हे, तर भारतभरात दंगली होऊ नयेत, यासाठी पोलिसांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. नूंह येथील दंगल आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना घंटोन्घंटे वेळ लागतो, हे लज्जास्पद आहे. जर दंगलखोरांकडे एके ४७ मिळते, तर पोलिसांनाही आधुनिक शस्त्रांनी सज्ज करणे आवश्यक आहे. त्याही पुढे जाऊन दंगल घडत असतांना ती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना ‘मोकळीक’ देणारा कायदाही असायला हवा. या दंगलीमध्ये १४ वर्षीय मुलेही हिंदूंवर आक्रमण करण्यात सहभागी झाली होती. ‘अल्पवयीन मुलांवर कारवाई होत नाही’, हे जिहादी जाणून आहेत. त्यामुळे मुलांना पुढे करून ते त्यांचा हेतू साध्य करत आहेत. असे आहे, तर त्यांना वठणीवर आणण्यासाठी कायद्यामध्येही पालट करायला हवा. त्याही पुढे जाऊन पोलीसदलाला ‘सर्वधर्मसमभाव’ मानसिकतेतून मुक्त करायला हवे. जिहादी जाळपोळ करत असतांना त्यांना रोखण्यात पोलीस कुठे न्यून पडले ? एरव्ही हिंदूंवर मर्दुमकी गाजवणारे पोलीस जिहाद्यांसमोर नांगी का टाकतात ? जर जिहादी लहान मुलांचा वापर हिंदूंना संपवण्यासाठी करत असतील, तर हिंदूंना वाली कोण ? यातून जी हानी होते, ती हिंदूंचीच झाली. त्याही पुढे जाऊन त्यांचे जे खच्चीकरण झाले, त्यातून हिंदू भविष्यात उभे कसे रहाणार ?
‘भारतात आतंकवादी कारवाया न्यून झाल्या आहेत’, असे कुणी म्हणत असेल, तर त्यांनी नूंह येथील घटनेकडे पहावे. यावरून असेच दिसून येते की, जिहादी अधिक सतर्क, शस्त्रसज्ज झाले आहेत. भारताला ‘गजवा-ए-हिंद’ करण्यासाठी ते वेगवेगळी षड्यंत्रे आखत आहेत आणि दुर्दैवाने त्यात ते यशस्वीही होत आहेत. त्यामुळे हिंदूंचे भवितव्य धोक्यात आहे. त्यांना ना पोलीस वाचवू शकतात, ना प्रशासन, ना राजकारणी. नूंहसारख्या घटना अशाच घडत राहिल्या, तर हिंदू अल्पसंख्य व्हायला वेळ लागणार नाही !
भारताला इस्लामीस्तान करण्याचे जिहाद्यांचे षड्यंत्र उधळून लावण्यासाठी सुरक्षायंत्रणांना अधिक सक्षम करणे आवश्यक ! |