कोईम्बतूर (तमिळनाडू) येथील बाँबस्फोटाच्या प्रकरणी आणखी एका आतंकवाद्याला अटक
कोईम्बतूर (तमिळनाडू) – गेल्या वर्षीय येथील एका प्राचीन मंदिराजवळ चारचाकी गाडीमध्ये झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी पोलिसांनी महंमद इद्रीस याला अटक केली आहे. या स्फोटात मुख्य आरोपी जेम्स मुबिन याचा मृत्यू झाला होता. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए.’च्या) अधिकार्यांनी सांगितले की, इद्रिसने त्याच्या साथीदारांसह आक्रमण करण्याचा कट रचला होता.
Tamil Nadu: कोयंबटूर में आईएसआईएस से जुड़े कार बम धमाके में NIA की बड़ी कार्रवाई, एक और आरोपी को किया गिरफ्तार#TamilNadu #Coimbatore #ISIS #NIA #CarBombBlast https://t.co/BW5BSxYtTg
— Amar Ujala (@AmarUjalaNews) August 2, 2023
इद्रिस आणि मुबिन यांचे चांगले संबंध होते. आतंकवादी आक्रमणाच्या कटाच्या बैठकीमध्ये ते अन्य आरोपींसमवेत सहभागी होते. मुबिन इस्लामिक स्टेटच्या जिहादी विचारसरणीपासून प्रेरित होता. यापूर्वी या स्फोटाच्या प्रकरणी महंमद असरूथीन, महंमद थल्हा, फिरोज, महंमद रियास, नवास आणि अफसर खान यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे.