(म्हणे) ‘शेजारी देशांशी भारताची भूमिका आक्रमक !’ – पाकिस्तान
चोराच्या उलट्या बोंबा !
इस्लामाबाद – शेजारी देशांसमवेत भारताने युद्धखोर भूमिका अवलंबली आहे. भारत इतर देशांशी मोकळेपणाने वागतो; पण पाकिस्तानच्या संदर्भात तसे होत नाही, असा फुकाचा आरोप पाकिस्तानच्या उप परराष्ट्रममंत्री हिना रब्बानी खार यांनी केला आहे. ‘पाकिस्तान गव्हर्नन्स फोरम २०२३’ला संबोधित करतांना रब्बानी खार यांनी भारताला पाश्चिमात्य देशांचा आवडता देश असल्याचे सांगितले.
#WATCH: Pakistan Deputy FM Hina Rabbani Khar calls India “darling of the West” and accuses India of being “very very close-minded” to some of its own people and to some countries. #Pakistan #HinaRabbaniKhar pic.twitter.com/IgB9iAhGaf
— Statecraft (@statecraftdaily) August 1, 2023
या वेळी रब्बानी खार यांनी त्यांच्या भाषणात चीनचे कौतुक केले. भारताची अमेरिकेशी वाढत असलेली जवळीक आणि चीन अन् पाकिस्तान यांच्यासमवेत वाढत असलेल्या तणाव यांविषयी या पार्श्वभूमीवर रब्बानी खार यांनी हे वक्तव्य केेल्याचे बोलले जात आहे.