(म्हणे) ‘अफगाणिस्तानने तालिबानी आतंकवाद्यांवर कारवाई केली नाही, तर त्यांच्या भूमीत घुसून कारवाई करू !’ – पाकिस्तान
इस्लामाबाद (पाकिस्तान) – ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) आणि ‘इस्लामिक स्टेट खुरासान’ या जिहादी आतंकवादी संघटनांच्या विरोधात पाकिस्तानने पावले उचलली आहेत. पाकने अनेक वेळा सांगूनही अफगाणिस्तान सरकार तालिबानी आतंकवाद्यांवर कारवाई करत नसल्याचा पाक आरोप करत आहे. अशातच पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो म्हणाले की, जर अफगाणिस्तानचे तालिबान सरकार ‘टीटीपी’वर कारवाई करण्यास अपयशी ठरले, तर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अंतर्गत पाककडे ‘आत्मरक्षणार्थ’ अफगाणिस्तानमध्ये लपलेल्या आतंकवाद्यांवर कारवाई करण्याचा अधिकार आहे. पाककडे हा शेवटचा पर्याय असेल, असेही भुट्टो म्हणाले.
Bilawal Urges Afghanistan To Take Decisive Action Against Terrorism
For details:https://t.co/ce0o0txjFG#BilawalBhuttoZardari #FM #Afghanistan #tti #ttimagazine #thetruthinternational pic.twitter.com/HHu44Ok0GM
— The Truth International (@ttimagazine) August 2, 2023
दुसरीकडे तालिबान सरकार दावा करत आले आहे की, टीटीपीचे आतंकवादी अफगाणिस्तानमध्ये नसून पाकमध्येच आहेत. काही दिवसांपूर्वी पाकच्या बाजौरमध्ये इस्लामिक स्टेट खुरासानने केलेल्या आत्मघातकी आक्रमणामध्ये ५४ लोक ठार झाले होते, तर २०० हून अधिक जण घायाळ झाले.
संपादकीय भूमिकापाकने जे पेरले, ते उगवले आहे. त्याने पोसलेला आतंकवाद त्याच्या मुळावर उठला आहे, हेच खरे ! |