गोवा : १९ वर्षीय युवतीवर बलात्कार करणारा अल्बाज खान पोलिसांच्या कह्यात !
पणजी, १ ऑगस्ट (वार्ता.) – हडफडे येथे एका रिसॉर्टमध्ये (रिसॉर्ट म्हणजे निवासाची व्यवस्था असणारे उपाहारगृह) एका १९ वर्षीय युवतीवर बलात्कार करणारा अल्बाज खान (वय २१ वर्षे) याला हणजूण पोलिसांनी कह्यात घेतले.
Anjuna Crime News: मैत्रिणीच्या प्रियकरानेच केला बलात्कार! पीडितेने सांगितला ‘तो’ भयानक अनुभव#CrimeNews #CrimeAlert #anjunapolice #dainikgomantakhttps://t.co/yDpToV15lw
— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) August 1, 2023
पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित युवती संशयित अल्बाज खान याच्या मैत्रिणीसमवेत हडफडे येथील एका रिसोर्टमध्ये सहलीसाठी गेली होती. या वेळी अल्बाज खान याने पीडित युवतीवर बलात्कार केला. अल्बाज खान हा मूळचा हावेरी, कर्नाटक येथील असून तो कामुर्ली येथे रहात होता. पोलिसांनी अल्बाज खान याला भारतीय दंड संहितेचे कलम ३७६ अंतर्गत कह्यात घेतले आहे.