गोवा : पिर्ण येथील ३ मंदिरांमध्ये चोर्या
गोव्यातील मंदिरांत चोरीच्या घटना चालूच !
म्हापसा, १ ऑगस्ट (वार्ता.) – केरी, पेडणे येथील प्रसिद्ध श्री आजोबा मंदिरात चोरी झाल्याची घटना ताजी असतांनाच पिर्ण येथील ३ मंदिरांमध्ये ३१ जुलैच्या रात्री चोरी झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. चोरट्यांनी पिर्ण येथील श्री केळंबिका मंदिर, श्री विठ्ठल मंदिर आणि श्री पांडुरंग मंदिर या मंदिरांमध्ये चोरी केली आहे. ही तीनही मंदिरे २०० मीटर अंतरात आहेत. संबंधित मंदिरांच्या पुजार्यांना १ ऑगस्ट या दिवशी सकाळी मंदिरात चोरी झाल्याची माहिती मिळाली. यानंतर देवस्थान समिती आणि पोलीस यांना ही माहिती देण्यात आली. श्री केळंबिका मंदिरातील ५ सहस्र रुपये, तर श्री विठ्ठल मंदिर आणि श्री पांडुरंग मंदिर येथील २ सहस्र रुपये रोख रक्कम चोरीस गेली आहे. या मंदिरांतील दागिने किंवा इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेलेल्या नाहीत.
श्री केळंबिका मंदिराच्या ठिकाणी ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ आहेत. याद्वारे पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
Pirna Temple Theft: पिर्णातील तीन मंदिरांमध्ये चोरी; फंडपेटी फोडून रोकड लंपास#pirna #TheftCase #dainikgomantakhttps://t.co/V2kO0d7ONM
— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) August 1, 2023
बार्देश तालुक्यात १५ दिवसांत २ घरे आणि ४ मंदिरे यांमध्ये चोर्या
गेल्या १५ दिवसांत बार्देश तालुक्यात २ घरे आणि ४ मंदिरे यांमध्ये चोर्या झाल्या आहेत. तसेच बार्देश, पेडणे आणि डिचोली तालुक्यांमध्ये प्रत्येकी १ अशा एकूण ३ महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या पळवण्याचे प्रकार घडले आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी ५ पथके सिद्ध केली आहेत; मात्र चोरीच्या घटना चालूच आहेत. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंची मंदिरे असुरक्षितच ! |