कुराण जाळल्यावरून आकांडतांडव करणारी इस्लामी सरकारे ही रानटी आणि ढोंगी !
नेदरलँड्स येथील कट्टर इस्लामविरोधी खासदार गीर्ट विल्डर्स यांचे ट्वीट
अॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) – एकीकडे जगभरातील इस्लामी सरकारे ही कुराण जाळल्याच्या घटनांवरून आकांडतांडव करतात. दुसरीकडे इस्लामी जगतामध्येच महिला, नास्तिक, ख्रिस्ती, ज्यू, हिंदू आदींवर होत असलेल्या अनन्वित अत्याचारांच्या विरोधात मात्र ही सरकारे पूर्णपणे शांत आणि उदासीन रहातात. हा त्यांचा रानटीपणा आणि ढोंगीपणा आहे, असा घणाघात येथील ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि खासदार गीर्ट विल्डर्स यांनी ट्वीटच्या माध्यमातून केला.
Islamic governments are outraged by the burning of Qurans but they are totally silent and indifferent about their own brutal violence against women, apostates, non-believers, christians, homosexuals, Jews and Hindus in the Islamic world. Barbaric hypocrites!
— Geert Wilders (@geertwilderspvv) July 30, 2023