(म्हणे) ‘युद्ध हा पर्याय नसून भारताशी चर्चा करण्यासाठी सिद्ध !’ – शाहबाझ शरीफ, पाकचे पंतप्रधान
आर्थिक डबघाईला गेलेल्या जिहादी पाकचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांचे नाटक !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – भुकेकंगाल झालेला पाक आता भारताची मनधरणी करण्याचे नाटक करीत आहे. पाकचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी भारताला आवाहन करतांना म्हटले की, युद्ध हा पर्याय नसून आम्ही भारताशी चर्चा करण्यासाठी सिद्ध आहोत. जर भारत याविषयी गंभीर असेल, तर आम्ही त्याच्याशी चर्चा करू इच्छितो. गेल्या ७५ वर्षांत उभय देशांमध्ये ३ युद्धे झाली. यांनी केवळ दारिद्य्र, बेरोजगारी आणि पायाभूत सुविधांचा अभाव या समस्यांनाच जन्म दिला आहे.
#IEWorld | Ready to hold talks with India on all outstanding issues: Pak PM Shehbaz Sharifhttps://t.co/gmVV6FxESY
— The Indian Express (@IndianExpress) August 1, 2023
शरीफ पुढे म्हणाले की, पाकिस्तान परमाणू शस्त्रसंपन्न देश आहे. हे आक्रमक होण्यासाठी नव्हे, तर स्वत:चे रक्षण करण्यासाठी ! जर कधी परमाणू युद्धासारखी स्थिती उत्पन्न झालीच, तर याविषयी काही सांगण्यासाठी कुणी जिवंतच रहाणार नाही. युद्ध हा पर्याय नाही !
(सौजन्य : Aaj Tak)
संपादकीय भूमिकापाकने भारतामध्ये जिहादी आतंकवाद्यांना पाठवणे बंद केले पाहिजे. कुख्यात आतंकवादी हाफिज सईद, दाऊद इब्राहिम यांना भारताच्या स्वाधीन केले पाहिजे. तेथील हिंदूंच्या रक्षणार्थ ठोस उपाययोजना आखली पाहिजे. पाकव्याप्त काश्मीरला भारताकडे सुपूर्द केले पाहिजे. त्यानंतरच भारत पाकशी चर्चा करण्याचा विचार करील, हे त्याने लक्षात घ्यावे ! |